
प्रतिनिधी: सात दिवसांच्या ब्रेकनंतर सोन्याने उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे सोन्यात घसरण झाली होती. १० दिवस मोठी पडझड झाल्यानंतर आज सोन्याने उसळी घेत बाजारात नवी उपलब्धता निर्माण केली. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ११४ रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९८४० रूपयांवर पोहोचले आहेत. २२ कॅरेट प्रति ग्रॅम दरात १०५ रूपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे २२ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९०२० रूपयांवर पोहोचले आहेत. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमतीत ८६ रूपयांची घसरण झाली असल्याने प्रति ग्रॅम दर ७३८० रूपयांवर पोहोचले आहेत. सराफा बाजारातील २४ कॅरेट प्रति तोळा किंमत ११४० रूपयांनी वाढत दर ९८४०० रूपयांवर गेले आहेत. २२ कॅरेट प्रति तोळा दर १०५० रूपयांनी वाढत ९०२०० रुपयांवर गेले असून १८ कॅरेट प्रति तोळा दर ७३८०० रूपयांवर गेले आहेत. हे दर कुठल्याही जीएसटी, इतर करांव्यतिरिक्त असतात.
आज भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) यामध्ये सोन्याच्या निर्देशांकात १.०४% वाढ झाली आहे. परिणामी सोन्याची पातळी किंमत ९७०७५.०० रूपयांवर गेली आहे. गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index ) निर्देशांकात १२.३० पर्यंत १.१३% वाढ झाली होती.युएस गोल्ड स्पॉट दरात (Gold Spot Rate) १.२०% वाढ झाल्याने दर पातळी ३३४७.८१ डॉलरवर पोहोचली आहे. काल स्पॉट गोल्ड ३,२४८ आणि ३,३०० डॉलरच्या दरम्यान व्यवहार झाला होता.आज पातळी ३३४७ डॉलरवर आहे. आज मुंबई पुण्यासह बहुतांश शहरात २४ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९८४० रूपये, २२ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९०२० रूपये तर १८ कॅरेट प्रति ग्रॅम दर ७४४० रूपयांवर पोहोचली आहे.
आज सोन्याच्या दरात झालेली वाढ कशामुळे?
गेल्या १० दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. इस्त्राईल इराण यांच्यातील युद्धाविरामामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली होती. कमी झालेली मागणी व मुबलक पुरवठा यामुळे बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात सातत्याने घसरण झाली होती. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या दरातही सातत्याने घसरण झाल्यावर सोने चांदीतही घसरण कालपर्यंत कायम राहिली. आज युएस डॉलरच्या तुलनेत रूपयात वाढ झाली असल्याने तसेच पुन्हा एकदा फिजिकल डिलिव्हरीमध्ये सोने मागणीत वाढ झाली आहे. पुन्हा पुरवठ्यात घट होत असताना, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीत वाढ केली आहे. ज्यामुळे आरबीआयकडे असलेलं सोन्याच्या साठ्यात आणखी वाढ होऊ शकते. मात्र ही वाढ होत असताना मागणीही वाढल्याने गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याच्या पर्यायाकडून घसरलेल्या कच्च्या तेलाकडे लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे.
आता लवकरच महत्वाच्या कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाही निकालाकडे गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केलेले आहे. तसेच अमेरिका भारत व अमेरिका चीन यांच्यातील बोलणी अंतिम होईपर्यंत व अमेरिकन बेरोजगारी डेटा प्रकाशित होईपर्यंत सोन्याच्या सपोर्ट लेवलला धक्का बसण्याची शक्यता अधिक आहे. भारताच्या मजबूत 'फंडामेंटल' मुळे उच्चांक अपेक्षित नसला तरी आगामी काळात चांगली वाढ सोन्याच्या दरात अपेक्षित आहे. जागतिक बाजारपेठेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ९ जुलैच्या टॅरिफ अंतिम मुदतीआधी गुंतवणूकदार व्यापार करारांकडे पाहत असल्याने सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. २ एप्रिलपासून सुरू झालेला टॅरिफ अंमलबजावणीतील ९० दिवसांचा विलंब (Extension)पुढील आठवड्यात संपणार आहे.अंतिम मुदतीपूर्वी व्यापार करार करण्यात अयशस्वी झालेल्या देशांना ५०% पर्यंतच्या परस्पर शुल्काच्या (Reciprocal Tariff) पुनर्लागूचा (Reinitiated) सामना करावा लागणार आहे. निश्चित व्यापार परिणामांबद्दल गुंतवणूकदारांच्या चिंतेमुळे आणि नवीन क्षेत्रीय शुल्काच्या जोखमीमुळे सुरक्षित-आश्रयस्थान असलेल्या मालमत्तेकडे गुंतवणूकदार वळत आहेत.आशियाई व्यापाराच्या वेळेत अमेरिकन डॉलर निर्देशांक मंदावला आहे. यांचा एकत्रित परिणाम होऊन सोन्यात वाढ होत आहे.
चांदीच्या दरात सोन्याची पुनरावृत्ती!
चांदीने सोन्याच्या दराप्रमाणेच आपले स्वरूप प्राप्त केले आहे. आज सततच्या घसरणीनंतर चांदीही सोन्याच्या प्रमाणेच वधारली आहे. माहितीनुसार,चांदीच्या दरात प्रति ग्रॅम किंमत २.३० रूपये वाढली आहे तर प्रति किलो किंमत ११०००० रूपये झाली आहे. चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात (Silver Future Index) मध्ये दुपारपर्यंत ०.४१% वाढ झाली. भारतीय कमोडिटी बाजार एमसीएक्समधील चांदीच्या निर्देशांकात १.२९% वाढ होत दर पातळी १०७६६४ रूपये प्रति किलोवर गेली.
यापूर्वी चांदीच्या मागणीत घट झाल्यानेही बाजारात चांदी निर्देशांक घसरले होते. मात्र आर्थिक घडामोडी आणि व्यापार धोरण अनिश्चिततेच्या दरम्यान फेडरल रिझर्व्हच्या व्याजकपातील निर्णयामुळे तसेच कमकुवत अमेरिकन डॉलरमुळे चांदीच्या किमती सकाळपर्यंत ०.२१ % वाढून 105,449 वर स्थिरावल्या होत्या.फेड या वर्षी ७५ बेसिस पॉइंट्सने दर कमी करेल असे सांगण्यात येत आहे.कदाचित सप्टेंबरच्या सुरुवातीपासून सुरू होईल अशा वाढत्या अपेक्षांमुळे डॉलरची घसरण झाली, कारण मे महिन्यात अमेरिकन ग्राहक खर्च अनपेक्षितपणे कमी झाला होता.