कंपनीने म्हटल्याप्रमाणे, या आयपीओतील एकूण गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार ५०% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५%, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५% वाटा उपलब्ध असणार आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी ६१ समभाग म्हणजेच एक गठ्ठयासाठी बोली लावणे अनिवार्य असेल.
कंपनीबदल -
ही कंपनी २०११ साली स्थापन झाली होती. B2B ऑनलाईन शिक्षण व्यासपीठ (Online Education Platform) असून कंपनी परदेशी उच्च शिक्षणाच्या सेवा, सुविधा पुरवते. कंपनीचे प्रवर्तक डॉ विकाश अग्रवाल, पिंकी अग्रवाल, मनिष अग्रवाल आहेत. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४२८७.०७ कोटी रुपये आहे.
कंपनीची सद्य आर्थिक स्थिती -
कंपनीला आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील मार्च २०२४ मध्ये ७६३.४४ कोटींचा महसूल (Revenue) प्राप्त झाला होता. तो इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) वाढत मार्च २०२५ पर्यंत ८८४.८४ कोटींवर गेला आहे. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (EBITDA) मध्ये मार्च २०२४ मधील ७२.६४ कोटी तुलनेत वाढ होत मार्च २०२५ मध्ये नफा २१२.८२ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीला करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर वाढ झाली आहे. मार्च २०२४ मधील ११८. ९० कोटींच्या तुलनेत करोत्तर नफ्यात १५२.९३ कोटींपर्यंत वाढ झाली आहे.
कंपनीने आपल्या DHRP मध्ये प्रतिक्रिया दिली की, 'कंपनीने दाखल केलेल्या DRHP नुसार, कंपनीने नमूद केलेल्या काही जोखीम घटकांमध्ये हे समाविष्ट आहे.आमची कंपनी आमच्या महसुलासाठी काही जागतिक उच्च शिक्षण संस्थांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अशा जागतिक उच्च शिक्षण संस्थांचे कोणतेही नुकसान आमच्या व्यवसायावर, ऑपरेशन्सच्या परिणामांवर आणि आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम करू शकते. आम्ही आमच्या एजंट्सच्या सेवेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत. अशा कोणत्याही किंवा सर्व एजंट्सच्या नुकसानाचा आमच्या व्यवसायावर, ऑपरेशन्सच्या परिणामांवर आणि आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आमचे यश जागतिक उच्च शिक्षण संस्थांसोबतच्या आमच्या सततच्या सहकार्यावर अवलंबून आहे. अशा जागतिक उच्च शिक्षण संस्थांसोबत आमचे सहकार्य टिकवून ठेवण्यास असमर्थतेचा आमच्या व्यवसायावर, कामकाजाच्या निकालांवर आणि आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.'