Tuesday, July 1, 2025

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित वृद्ध महिला फिरण्यासाठी पहलगाममध्ये गेली होती. यादरम्यान ११ एप्रिल रोजी पीडित वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याचं सांगण्यात येत आहे.



आरोपीची मानसिकता अत्यंत विकृत


या प्रकरणातील आरोपी झुबैर अहमद ताब्यात घेतले असून ३० जून २०२५ रोजी अनंतनाग जिल्हा कोर्टात याबाबत सुनावणी झाली. जेव्हा न्यायालयात आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली तेव्हा त्याने आरोप नाकारले, मात्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारत या घटनेतील मानसिकता अत्यंत विकृत असल्याचे ठामपणे निदर्शनास आणून दिले. आरोपी झुबैर अहमद हा पहलगाममधील स्थानिक रहिवाशी आहे.




नेमकं प्रकरण काय?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ११ एप्रिल रोजी बलात्कारानंतर महिला गंभीर जखमी झाली होती. आरोपी अहमदने तिच्या हॉटेलच्या खोलीत प्रवेश केला, तिला ब्लँकेटने झाकले आणि तिचं लैंगिक शोषण केलं. तर आरोपीने न्यायालयात दावा केला की, पोलिसांनी त्याला खोट्या प्रकरणात गुंतवले आहे. तसेच पीडित वृद्द महिलेने आरोपी म्हणून मला ओळखले देखील नाही, असा दावाही आरोपीने केला आहे. पोलिसांना मी आतापर्यंत सहकार्य केले असून यापुढेही करत राहील, असं आरोपीने न्यायालयात सांगितले.

Comments
Add Comment