Tuesday, July 1, 2025

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..
हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला होता यानुसार विद्यार्थ्यांना त्रिभाषा शिकण्याचा अभ्यास लादण्यात येणार होता. मात्र अनेक राजकीय नेते, सामान्य जनता आणि अनेक कलाकारांच्या अथक प्रयत्नातून हा जीआर रद्द झाला. मात्र या अनुषंगाने मराठी भाषेला मिळणाऱ्या दुय्यम दर्जाची बाब ऐरणीवर आली.आणि यावर भाष्य करण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित आंदोलनाचा इशारा दिला. त्यावर प्रक्रिया म्हणून चिन्मयी सुमितने एक व्हिडीओ बनवला यातील तिचा चेहरा बघून प्रेक्षक काळजीत पडले. या व्हिडिओत तिने या आंदोलनात सहभागी न होण्याचं कारण सांगितलं.

या व्हिडिओत अभिनेत्री चिन्मयी सुमित म्हणते कि,' "नमस्कार मी चिन्मयी सुमीत, आज 29 जून, आपण गेले काही दिवस तिसरी भाषा हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करत आहोत. गेले अडिच महिने आम्ही रान पेटवलंय आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.दोन दिवसांपूर्वी माझा एक अपघात घडला, त्यामुळे आंदोलनाला उपस्थित राहण्यासाठी डॉक्टरांनी मला परवानगी दिलेली नाही. मी तिथे जरी शरीरानं नसली तरी तमाम मराठी जनांना अत्यंत मी आवाहन करते की, या आंदोलनात आपली संख्या अंत्यंत मोठ्या प्रमाणात दिसू द्या. पहिल्यांदा असं होतंय जेव्हा राजकीय पक्ष आणि नागरीक समजा कोणत्या तरी एका विषयावर एकत्र येऊन आदोलन उभं करत आहेत. त्या सर्व राजकीय पक्षांना माझे मनापासून धन्यवाद. मी आज तिथे उपस्थित राहू शकत नाही याबद्दल मला खूप मोठी खंत वाटते, पण मला विश्वास आहे की तुम्ही सर्व मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहाल आणि ते आंदोलन कराल. आपण एकत्र आलो आहोत. एकत्र संघर्ष करुयात, विजयी होऊया. जय भीम, जय हिंद आणि जय महाराष्ट्र. जय मराठा."

चिन्मयीच्या या बोलण्यातून दिसून येत की तिच्या मनात आंदोलनात न उपस्थित राहण्याबद्दल खंत आहे. तिचा सुजलेला चेहरा आणि डोळे , चेहऱ्यावरच्या जखमा पाहून अनेकांनीं हळहळ व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा