बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

  23

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद


नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत त्याच्या कारकिर्दीतील पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकत इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात त्याने कॅनडाच्या ब्रायन यांगचा २१-१८, २१-१३ असा सरळ गेममध्ये पराभव केला.


२० वर्षीय आयुष, सध्या जगात ३४ व्या क्रमांकावर आहे, या हंगामात बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरमध्ये जेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला, ज्यामुळे भारताची परदेशात पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी दोन वर्षांची प्रतीक्षा संपली. लक्ष्य सेनने शेवटचे २०२३ मध्ये कॅनडा ओपन जिंकले होते.


आयुषचा यूएस ओपनमध्ये प्रवास खूप छान झाला. त्याने पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या मॅग्नस जोहानसेनचा २१-१७, २१-१९ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत त्याने त्याचाच देशबांधव थरुन मन्नेपल्लीचा २१-१२, १३-२१, २१-१५ असा पराभव केला. क्वार्टर फायनलमध्ये त्याने जागतिक क्रमवारीत ७० व्या क्रमांकावर असलेल्या कुओ कुआन लिनचा २२-२०, २१-९ असा पराभव केला. उपांत्य फेरीत आयुषला सर्वात मोठे आव्हान मिळाले जेव्हा त्याचा सामना जागतिक क्रमवारीत सहावा आणि अव्वल मानांकित चायनीज तैपेईचा चाउ तिएन चेनशी झाला. मागील पराभवाचा बदला घेत, आयुषने जोरदार पुनरागमन केले आणि सामना २१-२३, २१-१५, २१-१४ असा जिंकला.


दरम्यान, २०२३ मध्ये आयुषने अमेरिकेतील स्पोकेन येथे झालेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. ही कामगिरी करणारा तो केवळ सहावा भारतीय पुरुष एकेरी खेळाडू ठरला होता. आक्रमक फटकेबाजी आणि उत्कृष्ट कोर्ट कव्हरेजसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयुषने आपल्या बचावात्मक खेळात सुधारणा करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. बंगळूरु येथील प्रकाश पदुकोण अकादमीमधील प्रशिक्षणामुळे सर्वांगीण खेळात त्याची लक्षणीय प्रगती दिसून येत आहे. आयुष्य बंगळूरुच्या रेवा विद्यापीठातून क्रीडा विज्ञानात पदवीचे शिक्षण घेत आहे. जून २०२५ पर्यंत, शेट्टी पुरुष एकेरीमध्ये जागतिक क्रमवारीत ३१ व्या स्थानी आहे. लक्ष्य सेननंतर तो दुसरा सर्वोच्च मानांकित भारतीय खेळाडू आहे.


आयुषच्या प्रशिक्षणासाठी कुटुंबाचे बंगळूरुला स्थलांतर

आयुषने वयाच्या आठव्या वर्षी बॅडमिंटन खेळाला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने करकळा आणि मंगळूरु येथे स्थानिक प्रशिक्षक सुभाष आणि चेतन यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. वयाच्या १२ व्या वर्षी, त्याला अधिक चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी त्याच्या कुटुंबाने बंगळूरुला स्थलांतर केले. आई-वडिलांनी नेहमीच त्याच्या खेळाला प्राधान्य दिले.
Comments
Add Comment

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या