Tuesday, July 1, 2025

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी  हाताने विणले जात आहे वस्त्र..
झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं जातं आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला आहे. सध्या महाराष्ट्रभर भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. “विठ्ठल-विठ्ठल!” असा जयघोष करत वारकरी माऊलीला साद घालत आहेत. यंदा, या वारीत एक अनोखा उपक्रम सुरू आहे. झी टॉकीजचा ‘हँडलूम कॅन्टर’ सध्या फळटण फाट्याजवळ पोहोचला असून, शेकडो भाविक प्रेमाने आणि श्रद्धेने आपल्या हातून विठोबासाठी वस्त्र विणत आहेत. हा कॅन्टर वारी मार्गे पुढे पुढे जात राहील आणि प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांना भक्तीचा धागा प्रत्यक्ष हातात घेण्याची संधी मिळणार आहे.रुक्मिणी मातेकरिता नऊवारी साडी आणि श्री विठोबासाठी उपरणं प्रशिक्षित विणकरांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांच्या हस्ते विणलं जात आहे.

या भक्तिपूर्ण उपक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्रातील महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.वारीमध्ये हजारो महिलांची सुरक्षा राखणाऱ्या या अधिकाऱ्यांचं प्रतिकात्मक आणि सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व यामुळे श्रद्धा आणि समाजभान यांची एक सुंदर सांगड घालण्यात आली आहे.
या वस्त्रांची पूर्ती झाल्यावर ती पंढरपूर मंदिरात अर्पण केली जाणार आहे. हे केवळ वस्त्र नव्हे, तर लाखो भक्तांच्या मनाचा स्पर्श आहे.
या खास सजवलेल्या कॅन्टरमध्ये भाविकांसाठी थेट विणकामाचे डेमो, पारंपरिक पोशाख आणि वस्त्रांचं प्रदर्शन कलाकारांचा सहभाग श्रद्धा आणि संवाद यांचं अनुभवात्मक दालन खुल आहे. कॅन्टरच्या भिंती भगव्या कापडांनी सजवलेल्या आहेत, विणकामाच्या चौकट फ्रेम्स, पारंपरिक दिवे आहेत. मध्यभागी मोठा हातमाग उभा केला आहे.

याबद्दल पंढरपूरच्या उषाताई गायकवाड म्हणाल्या की ,“हे काम करताना असं वाटतंय, जसं विठोबाच्या चरणांना हात लावतोय. दरवर्षी चालायचं, पण यंदा हातही चालू लागले — श्रद्धेचं हे वेगळंच रूप आहे.” त्याचप्रमाणे विणकाम करत असताना एका भाविकाने हरिपाठ गुणगुणायला सुरुवात केली, आणि आजूबाजूच्या वारकऱ्यांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करत वातावरण पवित्र केलंयामुळे क्षणभर सगळं कॅन्टर पंढरीचंच मंदिर झाल्याच भासल.
वारी आणि हँडलूम कॅन्टर सध्या फलटण फाट्याजवळ कार्यरत आहे,येथून पुढे हा उपक्रम बारडकडे रवाना होणार आहे.
हा उपक्रम सर्व भाविकांसाठी खुला आहे.श्रद्धा फक्त मनात नको तर ती हातातूनही प्रकट झाली पाहिजे .ज्यांना भक्तीचं काहीतरी प्रत्यक्ष करायचं आहे,
त्यांनी नक्की या उपक्रमात सहभागी व्हावं. झी टॉकीजचे बवेश जानवलेकर म्हणतात की, “वारीतील प्रत्येक पाऊल ही श्रद्धा आहे. पण त्या पावलांनी विणलेलं वस्त्र हे केवळ कापड नाहीतर भक्तीचं प्रतीक आहे.आणि ते मंदिरात अर्पण होणं म्हणजे लाखो माणसांच्या मनाचा स्पर्श विठोबाला मिळणं.”

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >