Friday, October 24, 2025
Happy Diwali

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस अगोदरच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे. देशात सर्वदूर मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण असून, पुढील पाच दिवस देशाच्या बहुतेक भागात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजित वेळेनुसार, साधारणपणे ८ जुलै रोजी नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस अगोदर २९ जून रोजीच मोसमी वाऱ्यांनी सर्व देश व्यापला आहे. एक जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा लवकर २४ मे रोजी दाखल झाला. त्यानंतर २५ मे रोजी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला. लगेच दुसऱ्या दिवशी मोसमी वाऱ्यांनी आगेकूच सुरू केली.

मुंबईसह, पुणे आणि इतर काही भागात २६ मेपासून धडक दिली आणि १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. यंदा केरळमध्ये वेळेआधीच मोसमी पाऊस दाखल झाला आहे. अंदाजित वेळेपेक्षा ८ दिवस अगोदर आणि मागील १६ वर्षांच्या तुलनेत मोसमी वारे लवकर दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी तळकोकणात मोसमी पावसाचे आगमन झाले आणि लगेचच सोमवारी मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

यंदा १५ दिवस अगोदरच मोसमी पाऊस दाखल झाला आहे. सामान्यतः मुंबईत पावसाळा १० जूननंतर सुरू होते. दरम्यान, यंदा मोसमी पाऊस सर्वसाधारण तारखेच्या ९ दिवस आधी निकोबारमध्ये, ८ दिवस आधी केरळमध्ये आणि १३ दिवस आधी महाराष्ट्रात दाखल झाला. एक जूनपासून देशभरात सरासरीपेक्षा ९ टक्के, तर राज्यात १० टक्के जास्त पाऊस झाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा