पंचशीलनगरला दरडीच्या तोंडी नोटीस देऊन अधिकारी निर्धास्त

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात अनेक झोपडपट्ट्या अशा आहेत, ज्या डोंगरावर किंवा डोंगर उतारावर वसल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मुलुंड पश्चिमेकडील पंचशील नगर एक दरडप्रवण क्षेत्र आहे. महापालिकेने घोषित केलेल्या संवेदनशील दरडप्रवण ठिकाणांमध्ये पंचशील नगरचा समावेश आहे. पंचशील नगर येथील झोपड्या काही कच्च्या तर काही पक्क्या बांधकाम केलेल्या आहेत. हजारो लोकांनी येथील झोपड्यांमध्ये संसार थाटले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे येथील डोंगर भागातील माती आणि दगड कोसळण्याच्या घटना घडतच असतात. यासाठी पालिकेतर्फे एप्रिल मे महिन्याच्या सुरुवातीलाच या भागातील झोपड्यांवर ‘सदर ठिकाण धोक्याचे आहे, तातडीने स्थलांतर करावे’, अशी नोटीस महापालिकेचे अधिकारी चिकटवून जातात.


पंचशीलनगर या दरडप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींचा, समस्यांचा सामना करावा लागतो. माती सरकणे, दगड कोसळणे, भिंती पडणे यासारख्या घटना घडतात. त्यामुळे जीवितहानी व मालमत्तेच्या नुकसानीचा धोका अधिक असतो. येथील बहुतेक घरे ही झोपडपट्टी स्वरूपाची आहेत. त्यामुळे या घरात पावसाळ्यात पाणी गळती व पडझड होण्याची शक्यता अधिक असते. येथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. आरोग्याच्या समस्या, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव, वीज व शौचालय सुविधांचा अभाव यासारख्या समस्यांचा येथील रहिवाशांना रोजच सामना करावा लागतो. परंतु यावर उपाययोजना करत नाही ही खंत व्यक्त होत आहे.


उपाययोजना करायला हव्या




  • दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी मजबूत रिटेनिंग वॉल्स उभारण्याची आवश्यकता आहे.

  • जिथे भिंती तुटल्या आहेत, तिथे तत्काळ दुरुस्ती करून मातीचा निचरा आणि नालेसफाई योग्य पद्धतीने व्हावी.

  • डोंगर उतारावरून पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज यंत्रणा तयार करावी.

  • डोंगर उताराची माती किती ठिसूळ आहे, हे जाणून घेण्यासाठी जिओ टेक इंजिनीअरिंग चाचणी करावी.

  • पावसाळ्यात या परिसरात एनडीआरएफ व पालिकेची टीम सज्ज ठेवावी.

Comments
Add Comment

नेव्ही नगरमध्ये सुरक्षारक्षकाच्या हातावर तुरी देत अज्ञात व्यक्ती रायफल व काडतुसे घेऊन फरार !

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नौदलाच्या प्रवेशबंदी असलेल्या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी एक मोठी घटना घडली.

घरबसल्या मिळणार रस्‍ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची सविस्तर माहिती

नागरिकांसाठी https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या विशेष लिंकवर रस्‍ते कामांची माहिती उपलब्‍ध मुंबई : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या

‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित

मुंबई : "शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा

व्हॉट्सअ‍ॅप वेब बिघडला! – स्क्रोल न झाल्याने वापरकर्ते हैराण

मुंबई : सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप वेब पेजच्या एका नवीन समस्येची तक्रार केली आहे , जिथे ते त्यांच्या

गणेशोत्सवानंतर पावसाची विश्रांती, पण या दिवसापासून जोर वाढणार

मुंबई : गणेशोत्सवानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. पण ही विश्रांती काही दिवसांपुरतीच मर्यादीत आहे. पावसाचा जोर

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडळाची पहिली मोठी अ‍ॅक्शन; कोळी बांधवाला थेट कोर्टात खेचणार, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लालबागचा राजा गणेशोत्सव संपल्यानंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आला.