जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेसाठी मेरी पंचायत अ‍ॅप

एका क्लिकवर ग्रामस्थांच्या कारभाराची माहिती


अलिबाग : केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर दिल्याने आता ग्रामपंचायतीच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता असावी व या सर्व कारभाराची माहिती ग्रामस्थांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी पंचायतराज मंत्रालयाने तंत्रज्ञानाचे एक पाऊल पुढे टाकत 'मेरी पंचायत' हे अ‍ॅप आणले आहे. या अ‍ॅपमुळे गावच्या कारभाराची सर्व माहिती प्रत्येक ग्रामस्थाला सहज पाहता येणार आहे.



डिजिटल युगात आता स्थानिक स्वराज्य संस्थाही मागे नाहीत, हे 'मेरी पंचायत' अ‍ॅपने दाखवून दिले आहे. ग्रामपंचायतींचा विकास झपाट्याने होऊ लागलेला असून, केंद्र व राज्य सरकारकडून आता पंचायतींना थेट निधी मिळू लागला आहे. या निधीमुळे ग्रामीण प्रशासन गावातील कामे सहजरित्या किती निधी उपलब्ध झाला आहे, गावामध्ये सध्या कोणकोणती कामे सुरू आहेत, कोपणकोणत्या योजना सुरू आहेत, याची सर्व माहिती अ‍ॅपद्वारे प्रत्येकाला मिळू शकेल, ग्रामस्थांना ही माहिती मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये हेलपाटे घालावे लागणार नाहीत.


केवळ माहितीच नाही, तर अ‍ॅपच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामपंचायतीचा सामाजिक व आर्थिक लेखाजोखा देखील तपासून पाहता येणे शक्य होणार आहे.



ग्रामपंचायतीमधील संख्या, समित्यांची सदस्य माहिती, समित्यांचे अध्यक्ष, नोटीस बोर्ड, ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान याबरोबरच ग्रामपंचायतीची एकूण बँक खाती किती आहेत, त्यामध्ये शिल्लक रक्कम व प्रत्येक कामासाठी खर्च झालेली रक्कम याशिवाय कामाची सद्यस्थिती, वेगवेगळी देयके, पाण्याचे स्रोत, नळजोडणी, पाणीतपासणी अशी सविस्तर माहिती प्रत्येक ग्रामस्थाला अ‍ॅपवर पाहता येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराची सर्व कुंडलीच ग्रामस्थांपुढे उघड होणार आहे. गावांच्या विकासाभर भर देण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असून, मेरी पंचायत'मुळे कारभार अधिकाधिक पारदर्शक होणार आहे.

Comments
Add Comment

थंडीच्या कडाक्याने आंबा मोहरला

उत्पादनात २० टक्के वाढ अपेक्षित; बागायतदारांच्या आशा पल्लवित अलिबाग : कडाक्याच्या थंडीमुळे आंबा कलमांना मोहर

जिल्ह्यात दहा नगर परिषदांमध्ये धक्कादायक निकाल

प्रस्थापितांना मोठा दणका सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांचा कार्यकाळ संपल्यावर नगर

रोडपालीत शेकापचा ‘गड’ ढासळला

प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच

उरणच्या करंजा बंदराच्या कायापालटासाठी ७० कोटींची तरतूद

गाळाचा प्रश्न सुटणार, खासदार श्रीरंग बारणेंचा पाठपुरावा अलिबाग : उरण तालुक्यातील करंजा मच्छीमार बंदरात साचलेला

खोपोली नगर परिषदेत शिवसेनेचे वर्चस्व

नगराध्यक्षपदी कुलदीपक शेंडे; राष्ट्रवादी बॅकफूटवर खोपोली निवडणूक चित्र सुभाष म्हात्रे खोपोली : खोपोली नगर

उरण नगर परिषद नगराध्यक्ष निवडीत भाजपला धक्का

उरण निवडणूक चित्र विशाल सावंत उरण : उरण नगर परिषद निवडणुकीत झालेल्या चुरशीच्या निवडीत भाजपची स्थिती ‘गड आला पण