रविंद्र चव्हाण यांनी भाजपाचे युवा कार्यकर्ता ते मंत्री असा प्रवास केला आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल. कोकणात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी आली तर कोकणात पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
रविंद्र चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज
‘"राष्ट्र प्रथम्, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" हा भाजपा परिवाराचा मूलमंत्र अनुसरून, अंत्योदयाच्या मार्गावर आजवर वाटचाल करत आलो. या वाटचालीत पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ आणि जनतेचे आशीर्वाद लाभले. या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या पाठबळावर आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केंद्रीय मंत्री किरेनजी रिजिजू यांच्याकडे सुपूर्द केला. यापुढच्या वाटचालीत देखील तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मोलाचे ठरणार आहेत,’ असे रविंद्र चव्हाण म्हणाले.