Saturday, September 13, 2025

अल्लाहच्या शत्रूंना नेस्तनाबूत करू, ट्रम्प-नेतन्याहू यांच्याविरोधात इराणच्या शिया धर्मगुरूंचा फतवा

अल्लाहच्या शत्रूंना नेस्तनाबूत करू, ट्रम्प-नेतन्याहू यांच्याविरोधात इराणच्या शिया धर्मगुरूंचा फतवा

नवी दिल्ली: इराणचे शीर्ष शिया धर्मगुरूंनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात फतवा जारी केला आहे. यात त्यांनी ट्रम्प आणि नेतन्याहू यांचा उल्लेख अल्लाहचे शत्रू असा केला आहे. ग्रँड अयातुल्ला नासिर मकारिम शिराजी यांच्या फर्मानामध्ये जगभरातील मुसलमानांना एकजूट होण्यास सांगितले आहे. त्यांनी इराणविरुद्ध कारवाई करणारे अमेरिका आणि इस्त्रायल यांना धडा शिकवण्यास सांगितले आहे.

फतव्यामध्ये म्हटले आहे की कोणतीही व्यक्ती अथवा सरकार जे जागतिक इस्लामिक समूहाच्या नेतृत्वासाठी धोकादायक ठरत असेल तर त्याला चोख उत्तर दिले जाईल. इराणच्या सुप्रीम लीडरला धनकी देणे अथवा त्याच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना देवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल.

इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे उत्तर

इस्त्रायलने इराणच्या अणुकेंद्रावर हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्त्रायलचे खूप नुकसान केले होते. इराण आणि इस्त्रायल यांच्यात झालेल्या युद्धात अमेरिकेनेही एंट्री घेतली होती. त्यांनीही इराणच्या अनेक अणुकेंद्रांवर हल्ला केला होता. इराणने अमेरिकेलाही उत्तर दिले होते. दरम्यान, यानंतर शस्त्रसंधीवर सहमती बनली होती. मात्र इराण आणि इस्त्रायल यांच्यात तणावाची अद्याप स्थिती आहे.

Comments
Add Comment