Monday, June 30, 2025

IPO: आजपासून चार SME IPO बाजारात दाखल! मिळवा सगळ्या आयपीओची इत्यंभूत माहिती एका क्लिकवर पहिल्या दिवशी ' इतक्या ' पटीने सबस्क्रिप्शन

IPO: आजपासून चार SME IPO बाजारात दाखल! मिळवा सगळ्या आयपीओची इत्यंभूत माहिती एका क्लिकवर पहिल्या दिवशी ' इतक्या ' पटीने सबस्क्रिप्शन

प्रतिनिधी: आज एनएसई एसएमई (NSE SME) प्रवर्गात आज तब्बल चार आयपीओ बाजारात दाखल होत आहे.गेल्या महिन्याभरात काही निवडक आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आगामी काळात भरपूर आयपीओ बाजारात या आर्थिक वर्षात दाखल होत आहेत. नुकत्याच एचडीबी फायनांंशियल सर्विसेस आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचधर्तीवर आणखी चार आयपीओ गुंतवणूकदारांसाठी येत असल्याने जाणून घेऊया चार आयपीओबदल सवि स्तर माहिती....


१) सिल्की ओवरसीज लिमिटेड (Silky Overseas Limited) - सिल्की ओवरसीज लिमिटेड कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात दाखल होणार आहे. आज ३० जून ते २ जूलैपर्यंत आयपीओ बाजारात उपलब्ध असेल. एनएसई एसएमईवर आयपीओ येत आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) आयपीओसाठी कमीत कमी १२२४०० रूपयांची गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. १५३ ते १६१ रूपये प्रति समभाग प्राईज बँड (Price Band) निश्चित करण्या त आला आहे.


अर्जदारांसाठी किमान ८०० समभागांचा गठ्ठा (Lot) गुंतवणूकीसाठी आवश्यक असेल असे सांगण्यात आले आहे. Gretex Corporate Services Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे. तसेच Skyline Financial Services Private Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. मार्केट मेकर म्हणून Greatest Share Broking Private Limited कंपनी असेल.


कंपनीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनी ७ जुलैला बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. ३ जुलैपर्यंत पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) होणार आहे. एकूण ३०.६८ कोटी मूल्यांकनाचा आयपीओ असणा र आहे ज्यामध्ये १५.९२ लाख (२५.६३ कोटी) मूल्यांकनाचे शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांना उपलब्ध असतील. एकूण गुंतवणूकदारांना २२१९२०० शेअर्स विक्रीस उपलब्ध असतील.


मिळालेल्या माहितीनुसार, एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मार्केट मेकरसाठी १४.१३%, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (Qualified Institutional Investors QIB) साठी ३५.८३%, विना संस्थात्मक गुंतवणूकदार (Non Instituti onal Investors QIB) यांच्यासाठी १०.७८%, किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors RI) साठी २५.१३% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. आयपीओपूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून (Anchor Investors) कडून कंपनीने ७.६८ कोटी निधी प्राप्त केला आहे.


सावर माल गोयल, अनन्या गोयल, एस एम गोयल अँड सन्स (HUF Hindu Undivided Family) हे कंपनीने प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे एकूण भागभांडवल (स्टेक) ८६.३८% आहे.


कंपनीबदल -


२०१६ साली ही कंपनी स्थापन झाली होती. या कंपनीचा प्रमुख व्यवसाय टेक्सटाइल व्यवसायाशी संबंधित आहे. मिंक ब्लँकेट, बेडशिट, कंफर्टस या उत्पादन इकोसिस्टिमशी संबंधित आहे.


कंपनीला ३१ मार्च २०२४ पर्यंत ७०.२६ कोटींचा महसूल (Revenue) मिळाला आहे जो जानेवारी २०२४ पर्यंत वाढत १०५.३५ कोटींवर मिळाला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यातही वाढ झाली आहे. कंपनीला करोत्तर नफा (Profit After Tax PAT) ३१ मार्च २०२४ पर्यंत ५.५३ कोटी झाला जो जानेवारी २०२५ पर्यंत वाढत ९.१७ कोटी झाला होता. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (EBITDA) यामध्ये मार्च २०२४ मधील ११.०१ कोटींच्या तुलनेत जानेवारी २०२५ मध्ये वाढत १५.०७ कोटींवर गेला आहे.


कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) १०२.५२ कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा विस्तार करण्यासाठी, थकीत देणी चुकवण्यासाठी, खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requir ement) व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. कंपनीला सकाळी पहिल्या दिवशी ०.०४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी ०.०७ पटीने केले होते.


२) पुष्पा ज्वेलर्स लिमिटेड (Pushpa Jwellers Limited) - पुष्पा ज्वेलर्स कंपनीचा आयपीओ ९८.६५ कोटींचा असणार आहे. आज कंपनीच्या आयपीचा पहिला दिवस आहे. आज ३० जून ते २ जुलै कालावधीत हा आयपीओ (IPO) गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ५३.७० लाख समभागांचा (Shares) चा फ्रेश इश्यू असणार आहे. ज्यामध्ये १३.४१ लाख शेअर्स हे ऑफर फॉर सेल (OFS) साठी उपलब्ध असणार आहे. एनएसई एसएम ईवर हा ७ जुलैपर्यंत सूचीबद्ध (Listed) होणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना ३ जुलैपर्यंत समभागाचे वाटप (Allotment) होऊ शकते.


कंपनीने म्हटल्याप्रमाणे, या आयपीओसाठी प्राईज बँड (Price Band १४३ ते १४७ रूपये प्रति समभाग निश्चित करण्यात आला होता. एकूण ६७.११ लाखांचे समभाग फ्रेश इश्यूला उपलब्ध असणार असून त्यातून ३३६००० समभाग मार्केट मेकरसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी १४३००० रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. ज्यामध्ये १००० समभागांचा गठ्ठा असू शकतो. Affinity Global Capital Market Private Limited कंपनी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे. तर Cameo Corporate Services Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार असेल. मार्केट मेकर म्हणून Sunflower Broking Private Limited कंपनी काम पाहिल.


मृदुल टिब्रेवाल, अनुपम टिब्रेवाल, मधुर टिब्रेवाल हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी ज्यांच्याकडे कंपनीचे संपूर्ण भागभांडवल ताब्यात आहे. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मार्केट मेकरसाठी ४.७७% वाटा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांच्यासाठी ४५.२२%, विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांच्यासाठी १३.५८%, किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors)३१.६६%, वाटा उपलब्ध असणार आहे.आयपीओपूर्वी कंपनीने १४.०५ कोटीं ची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केली आहे.


कंपनीबद्दल -


पुष्पा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी २००९ जूनमध्ये स्थापन झाली होती. मुख्यतः कंपनी दागिने उत्पादनात आहे. मुख्यतः कंपनी २२ कॅरेट सोन्याच्या उत्पादनात अग्रेसर आहे. सोन्यासह कंपनी इतर प्रकारचे दागिने विकते. प्रामुख्याने कंपनी दक्षिण भारतात अधिक सक्रिय आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला ३१ मार्च २०२४ पर्यंत २५५.४९ कोटींचा महसूल (Revenue) मिळाला होता जो मार्च २०२५ पर्यंत वाढत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २८१.२७ कोटींवर प्राप्त झाला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) यामध्ये मार्च २०२४ मधील १३.५८ कोटी तुलनेत मार्च २०२५ पर्यंत २२.२९ कोटींपर्यंत वाढ मिळाली आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ३५६.०८ कोटी आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी खेळत्या भांडवलासाठी, नवीन विस्तारीकरणासाठी, भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure) दैनंदिन कामकाजासाठी, इतर खर्चासाठी करणार आहे, सकाळपर्यंत कंपनीच्या आयपीओला एकूण ०.२० पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ज्यामध्ये ०.०३ वाटा किरकोळ गुंतवणूकदारांकडून, ०.४६% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारकडून (QIB),०.०१ वाटा विना संस्थात्मक गुंतवणू कदारांचे (NII) सबस्क्रिप्शन मिळाले आहे.


३) सिडार टेक्सटाईल लिमिटेड (Cedaar Textile Limited)- सिडार टेक्सटाईल लिमिटेड कंपनी आज ३० जून ते २ जुलैपर्यंत बाजारात दाखल होणार आहे. एनएसई एसएमईवर हा आयपीओ ७ जुलैपर्यंत सूचीबद्ध होणार आहे. ए कूण ६० कोटी मूल्यांकनाचा आयपीओ असणार असून कंपनीने आयपीओसाठी प्राईज बँड (Price Band) १३० ते १४० रूपये प्रति समभाग निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी किरकोळ गुंतवणूकदारांना १३०००० रूपयांची गुंतवणूक आयपीओसाठी करावी लागणार आहे. अर्जासाठी किमान १००० समभागांचा गठ्ठा (Lot) घेणे आवश्यक आहे. Fast Track Finser Private Limited कंपनी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Skyline Financial Serv ices Private Limited रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. मार्केट मेकर म्हणून NMM Securities Private Limited कंपनी काम पाहणार आहे.


४३.५० लाख समभाग इश्यू होणार आहेत ज्यामध्ये २.१८ लाख समभाग मार्केट मेकरसाठी असतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकूण गुंतवणूकीपैकी ४.८८% वाटा मार्केटमेकरसाठी, २६.९१% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी २९.७४%, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३३.५९% वाटा उपलब्ध असणार आहे. गुंतवणूकदारांना कमीतकमी १००० समभागासाठी बिडींग करावे लागणार आहे.


कंपनीबद्दल -


राजेश मित्तल, विरेंदर गोयल, बचनगडा सरस्वथी, मोनाप्पा बचनगडा हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. प्रवर्तकांकडे आयपीओआधी संपूर्ण १०० टक्के भागभांडवल हिस्सा आहे जो आयपीओनंतर ६८.६६% होणार आहे. कंपनीने आयपीओपूर्वीच ९.५२ कोटींची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केली आहे. सप्टेंबर २०२० मध्ये स्थापित झालेली कंपनी टेक्सटाइल व्यवसायाशी संबंधित आहे. मार्च २०२४ पर्यंत कंपनीला १९१.०१ कोटीचा महसूल (Revenue) मिळाला होता जो डिसेंबर २०२४ पर्यंत घसरत ११३.९१ कोटींवर आला होता. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) यामध्ये मार्च २०२४ मधील ११.०५ कोटीं च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये घसरण होत ७.०६ कोटींवर पोहो चला आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी नवीन प्रकल्पांसाठी, मशिन्सचा आधुनिकीकरणासाठी, खेळत्या भांडवलासाठी व दैनंदिन कामकाजासाठी व इतर खर्चासाठी करण्यात येणार आहे. सकाळ पर्यंत कंपनीला एकूण ०.०१ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी ०.०३ पटीने, व इतर गुंतवणूकदारांकडून ० पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे.


४) वंदन फूडस लिमिटेड (Vandan Foods Limited)- वंदन फूडस लिमिटेड कंपनीचा आयपीओ आज ३० जून ते २ जुलैपर्यंत बाजारात दाखल होणार आहे. बीएई एसएमईवर आयपीओ ७ जुलैला सूचीबद्ध (Listed) होणार आहे. कमीत कमी १२०० समभागाचा गठ्ठा (Lot) असणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी १३८००० रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, आयपीओसाठी प्राईज बँड ११५ रूपये प्रति समभाग निश्चित करण्यात आला होता. Nirbhay Capital Services Private Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Bigshare Services Pvt Limited कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम पाहेल. मार्केटमेकर म्हणून Aftertrade Broking Pvt Ltd कंपनी काम पाहणार आहे.


गुंतवणूकदारांना कमीत कमी १२०० समभागांचे बिडींग करावे लागणार आहे. एकूण विक्रीसाठी २७७२००१ समभाग विक्रीसाठी असणार आहे ज्यामध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ४५.२४%, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ४५. २४%, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (४५.२४%) उपलब्ध असणार आहे.


कंपनीबद्दल -


कंपनी २०१५ साली स्थापन झाली होती. कंपनी प्रामुख्याने रिफाईन तेल, कास्टर तेल केक उत्पादनात कार्यरत आहे. कंपनी B2B, B2C उत्पादनातही कार्यरत आहे. कल्पेश भगवानदास ठक्कर, राकेश कुमार पटेल, जितेंद्र पटेल, ज्योत्स्ना पटेल, कल्पेशकुमार ठक्कर हे कंपनीने प्रवर्तक आहेत.


कंपनीला मार्च २०२४ मध्ये ४८.७३ कोटींचा महसूल मिळाला होता जो डिसेंबर २०२४ मध्ये वाढत ७२.६६ कोटी मिळाला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात मार्च २०२४ मध्ये २.६४ कोटी मिळाला जो डिसेंबर २०२४ मध्ये वाढत ४.५४ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (EBITDA) यामध्ये मार्च २०२४ मधील ३.६५ कोटींच्या तुलनेत वाढत ६.९२ कोटीवर पोहोचला आहे. कंपनीचे बाजार भांडवल ९६.४३ कोटी रुपये आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओतील निधीचा वापर खेळत्या भांडवलासाठी, थकबाकी चुकवण्यासाठी, भांडवली खर्चासाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. कंपनीला सकाळपर्यंत एकूण ०.१४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ज्यामध्ये ०.२७ पट सबस्क्रिप्शन किरकोळ गुंतवणूकदारांकडून, तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अजून कुठलेही सबस्क्रिप्शन मिळालेले नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >