तेलसाठ्यांसाठी आपत्कालीन योजना

उमेश कुलकर्णी


इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे इराणने होर्मुझचा तेल मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचे परिणाम जगावर व्हायचे ते होतील, पण भारतावर त्याचे निर्णायक आणि अत्यंत गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे भारताला पर्यायी योजना तयार ठेवावी लागत आहे आणि त्या दृष्टीने भारताने पर्यायी योजना तयार ठेवली आहे. या तेलसाठ्यांना स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्हज असे म्हणतात आणि त्यांचा उपयोग तेलाचे साठे तयार ठेवण्यासाठी होतो. वेळोवेळी जे तेलाच्या संदर्भात शॉक्स बसतात त्यांचा मुकाबला करण्यासाठी या एसआरपीचा उपयोग होतो आणि भारताचे असे साठे आहेत. भारत आता आणखी सहा ठिकाणी असे एसआरपी करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी तेलाचे साठे तयार करण्याची योजना त्याने तयार ठेवली आहे. इंजिनीअर्स लिमिटेड यासाठी अभ्यास करत आहे आणि त्यांच्याच ताब्यात ते तेलसाठे सध्या आहेत.


असे साठे ठेवणे कितपत योग्य आहेत आणि कितपत ते किफायतशीर आहेत याचा अभ्यास म्हणजे व्यवहार्यता स्टडी सध्या इंजिनीअर्स लिमिटेड हे करत आहे. सध्या भारताची योजना अशी आहे की, सध्या आहे त्या तेल साठ्यांमध्ये दुप्पट वाढ करून ते तेल साठे एसपीआर सहा डावपेचात्मक ठिकाणी साठवण्याचा प्लॅन आहे. आजच्या बदलत्या आणि अस्थिर जगात ऊर्जा सुरक्षेसाठी तेलाची सुरक्षा ठेवणे आवश्यक आहे हे जाणून त्याची माहिती असलेल्या दोन जणांना अवगत असलेल्यांनी सांगितले. ते अशा ठिकाणी साठवले जातील की, त्यांची किंमत कमी असेल आणि जेव्हा वाटेल त्या क्षणी ते रिलीज करता येतील. जेव्हा त्यांची गरज लागेल तेव्हा ते उपयोगात आणता येतील. कारण तेलाचा भारत हा तिसरा मोठा आयातदार देश आहे आणि जो ८५ टक्के तेल परदेशातून आयात करतो. सरकारने इंजिनीअर्स लिमिटेडला या प्रकल्पाचा योग्यता अहवाल सादर करण्यास आणि ज्याला डीएफआर असे म्हटले जाते ते सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सहा ठिकाणी असे साठे तयार करण्यास सांगण्यात आले आहे. एसपीआरचा खरा उद्देश्य आणीबाणीच्या काळात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील व्यत्ययाचा परिणाम जाणवू नये म्हणून केला जातो. आखाती किनारपट्टीत आणि अन्य ठिकाणी हे तेलसाठे ठेवले जातात. होर्मुझची खाडी हा तेलाचा भारतात येण्यासाठी सध्या सर्वात सोपा आणि कमी खर्चिक मार्ग आहे. पण इस्रायल आणि इराण युद्धात तो मार्ग बंद करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे भारताला ही पर्यायी योजना तयार ठेवावी लागली आहे. या योजनेचा तपशील असा की, भारताचे भूमिगत साठे हे विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), बंगळूरु(कर्नाटक) आणि पडूर(कर्नाटक) येथे आहेत. या तेलसाठ्यात ५.३३ दशलक्ष मेट्रिक टन इतके तेल साठवून ठेवण्याची क्षमता असते. हे साठे भारताच्या उर्जा सुरक्षेसाठी महत्वाचे आहेतच पण जागतिक पेट्रोल पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होतो जसे की आता होर्मुझची खाडी मार्ग बंद झाला आहे त्यावेळी हे तेल साठे उपयोगात आणले जातात. या तेलसाठ्याचे महत्त्व असे की ते भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर आहेत. त्यामुळे ते रिफायनरीजसाठी सहज उपलब्ध होऊ शकतात. बाह्य पुरवठा व्यत्ययांना प्रतिसाद म्हणून हे साठे काम


करत असतात. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना वाजपेयी प्रशासनाने दीर्घकालीन उपाय म्हणून तेलाचे स्ट्रॅटिजिक साठे तयार करण्याचे धोरण आणले आणि त्यानुसार वरील तीन ठिकाणी असे तेलाचे साठे आहेत. त्यांच्याच कार्यकाळात बंगळूरु, पदूर आणि विशाखापट्टणम येथे असे स्ट्रॅटिजिक तेल साठे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आज भारताला त्याचा उपयोग होत आहे. आता होर्मुझचा तेल मार्ग बंद झाला तरीही भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण तेलाची आयात सुरू राहील. अर्थात थोडा खर्चिक मार्ग आहे कारण तेलाची वाहतूक नेहमीच समुद्रमार्गे करण्यात सोपे आणि स्वस्त पडते. आता केप ऑफ गुड होपला वळसा घालूनही भारताला तेल मिळवता येईल, पण त्याचा खर्च अवाढव्य असेल. शिवाय हुथी बंडखोरांकडून हा मार्ग सुरक्षित राहीलच याचा काहीही नेम नाही. तेव्हा भारताने आपला पर्यायी मार्ग तयार ठेवला आहे ते पण किती दिवस ते सांगता येणार नाही. जेवढे दिवस युद्ध लांबेल तितके दिवस भारताला आणि जगाला हे युद्ध तापदायक ठरणार आहे. भारताचे साठे किती दिवस उपयुक्त ठरतील याची कल्पना नाही. पण सध्या तरी हे साठे आहेत म्हणून भारताला काही दिवस तरी चिंता नाही. इस्रायल आणि इराण या दोन्ही संघर्षरत राष्ट्रांनी आज जगावर संकट आणले आहे. होर्मुझचा मार्ग बंद झाला, तर भारतावरील संकट आणखी गहिरे होईल. पण भारताने पर्यायी मार्ग तयार ठेवला आहे. अर्थात या व्यतिरिक्त तेल मिळवण्याचे अन्य मार्ग आहेत पण ते खर्चिक आणि आता ऐन युद्धाच्या क्षणी वापरण्याच्या मनस्थितीत नाहीत. एक मार्ग आहे तो म्हणजे विद्यमान साठ्यातून तेल काढणे. तसेच शेतात विहिरी खोदल्याने तेल मिळवता येते. काही देशांनी आणीबाणीच्या क्षणी तेलाचे साठे वाटून घेण्याचे करार केले आहेत पण तो मार्ग आपल्यासाठी उपलब्ध नाही.


रिलायन्सचे मुकेश अंबानी यानी भारतात तेल साठे शोधून काढण्याचे ठरवले होते पण तो प्रकल्प अर्धवट राहिला. त्यामुळे त्याचे काय झाले ते कुणालाच समजले नाही. पण भारतासमोर हाच एक मार्ग आहे तो म्हणजे तेलाचा पुरवठा कमी न होण्यासाठी एसआरपीचा मार्ग वापरणे. सध्याचा साठा जो एसआरपीच्या वेबसाईटवर प्रकाशित केला आहे त्यानुसार भारताकडे सध्या ३९५.३ दशलक्ष तेल शिल्लक आहे, त्यामुळे सध्या जरी भारताला चिंता नसली तरीही भविष्यात काय होईल ते माहीत नाही आणि प्रत्येक क्षणी पुढे काय होईल त्याबाबत प्रत्येक देशाने सावध असायला हवे.

Comments
Add Comment

Ex Date Expiry: आजच्या 'या' ४ कंपन्यांच्या लाभांश, Corporate Actions एका क्लिकवर -

१:१० स्टॉक स्प्लिट,२० रुपये लाभांश, १:१ बोनस इश्यू, राईट्स इश्यू - अनेक कंपन्यांनी आज शेअर्सवरील लाभांश

Airtel Business Latest News: एअरटेल बिझनेसने इंडियन रेल्वे सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (IRSOC) साठी बहु-वर्षीय करार जिंकला

एअरटेल एक ग्रीनफील्ड, बहु-स्तरीय, सायबरसुरक्षा 24x7x365 संरक्षण परिसंस्थेची रचना, बांधणी, अंमलबजावणी आणि संचालन करेल

डीपी वर्ल्डने हैदराबादची पहिली रीफर रेल फ्रेट सर्व्हिस न्हावा शेवा येथे सुरू केली

एक उपाय जो माल रस्त्यापासून रेल्वेपर्यंत नेतो आणि त्याचबरोबर खात्रीशीर जहाज कनेक्टिव्हिटी प्रदान करतो,

Tata Capital IPO Day 1: दिग्गज Tata Capital IPO मैदानात ! सकाळपर्यंत आयपीओला 'इतके' सबस्क्रिप्शन जीएमपीसह.. Returns साठी हा आयपीओ खरेदी करावा का जाणून घ्या सविस्तर

मोहित सोमण:आजपासून टाटा कॅपिटल लिमिटेड आयपीओ मैदानात दाखल होत आहे. आयपीओपूर्वी कंपनीने ४६४१.८३ कोटीचा निधी अँकर

Top Stock to buy: भरघोस कमाईसाठी 'हे' १६ शेअर लवकर खरेदी करा ! मोतीलाल ओसवासचा सल्ला! जाणून घ्या फंडांमेटल विश्लेषणासह

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने या संबंधित शेअर्सला बाय कॉल दिला आहे. जाणून घेऊयात नक्की त्यांनी आपल्या

Toyota Kirloskar Motors Sales : दिवाळीपूर्व काळात टोयोटाने सप्‍टेंबरमध्‍ये 'इतक्या' युनिट्सची बंपर विक्री

मुंबई:टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने सप्‍टेंबर २०२५ मध्‍ये तब्बल ३१०९१ युनिट्सची विक्री केली. या आकडेवारीमध्‍ये