चॉकलेटचा हट्ट धरला म्हणून दारुड्या बापाकडून लेकीची हत्या, आईने केली फाशीची मागणी

  89

लातूर: उदगीर तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारूच्या आधीन गेलेल्या वडिलांनी आपल्या चार वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला असल्याची घटना घडली आहे. बालाजी राठोड असे या निर्दयी बापाचे नाव आहे. 


राठोडला दारूचे प्रचंड व्यसन होते, त्यामुळे त्याच्या कुटुंबात वारंवार भांडणे होत होती. यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून तिच्या वाडिलांच्या घरी गेली होती. दरम्यान घरात ४ वर्षाची मुलगी आरुषी एकटी होती, त्यावेळी तिने आपल्या वडिलांकडे चॉकलेटसाठी पैसे मागितले होते. दरम्यान, राठोड यावेळी सुद्धा मद्यपान करत होता, आणि त्या नशेत त्याने आपल्या मुलीचा गळाच दाबला. ज्यात त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती संबंधित वृत्तसंस्थेला दिली.


सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार,  "आरोपीचे नाव बालाजी राठोड आहे, ज्याला आपल्या चार वर्षाच्या मुलीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे." पोलिसांनी हत्येची माहिती देताना सांगितले की, "आरोपीला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याचे घरगुती वाद भरपूर होते. त्याची पत्नी त्याला सोडून तिच्या माहेरी गेली होती, या दरम्यान दुपारी त्याची मुलगी आरुषीने त्याच्याकडे चॉकलेट खरेदी करण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी  रागाच्या भरात आरोपीने साडीने तिचा गळा दाबून खून केला."



पतीला फाशीची देण्याची मागणी


राठोडची पत्नी वर्षा हिने तिच्या पतीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आरोपी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथील रहिवासी आहे. त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे आणि त्याला अटक केली आहे. या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

"बाळाच्या रंगावरून बोलाल तर खबरदार..." टीव्ही अभिनेत्रीने ट्रोलर्सना खडसावले, केली थेट कायदेशीर कारवाई

हिंदी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या ७ महिन्यांच्या बाळाला सावळ्या रंगामुळे ट्रोल करण्यात

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण