कशेडी घाटातील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर भेगा

  50

संबंधित अधिकाऱ्यांसह तहसीलदारांकडून पाहणी


पोलादपूर : जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव हद्दीत रस्त्यावर भेगा पडल्याची बातमी एप्रिल महिन्याअखेरिस वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता स्थानिक ग्रामस्थपर्ग रूंदावणाऱ्या भेगांमुळे खडबडून जागा झाला आहे.


पावसाळयात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी हा प्रकार गांभिर्याने विचारात घेत तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या लक्षात आणून दिली. यामुळे शुक्रवारी तहसिलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून घटनास्थळी पाहणी केली व येत्या दोन दिवसात तत्काळ दुरुस्ती करण्याबाबत सूचना दिली.



पळचिल ग्रुप ग्रामपंचायतिचे माजी सरपंच उमेश मोरे, रवींद्र जाधव, प्रवीण मोरे, ग्रामस्थ आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भुयारी मार्गे चौपदरीकरण काम करण्यात आले. यावेळी भोगाव गावाच्या हद्दीत डोंगरांचे उत्खनन करून डोंगर कापण्यात आला. नवीन महामार्ग भुयारामार्गे वळविण्यात आला. याठिकाणी जवळच भोगावच्या हद्दीत जुन्या मार्गावरील रस्त्याला ५ ते १० मीटर अंतरावर मोठया प्रमाणात भेगा पडल्याने प्रस्तुत प्रतिनिधीने बातम्यांद्वारे संभाव्य धोक्याकडे यंत्रणांचे व ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. या बातम्यांमध्ये पावसाळयात येथील रस्ता खचून नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.


सद्यस्थितीत कशेडी घाटातील वाहतूक भुयारीमार्गे होत असल्याने कातळी बंगला म्हणजेच कशेडी टॅपच्या जुन्या नाक्यापर्यंत नेणाऱ्या जुन्या महामार्गावर वाहतूक प्रमाणात सुरू आहे. यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा नसला तरी भविष्यात किंवा पावसाळयात भुयारामार्गे काही अनुचित प्रकार घडल्यास पुन्हा मूळ कशेडी घाटातील जुन्या महामार्गावरून पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक वळवावी लागणार आहे.


यासाठी हा जुन्या महामार्गाची देखभाल दुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने वेळीच भेगा रूंदावण्यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी सूचना तहसिलदार कपिल घोरपडे यांनी संबंधित अभियंत्यांना केली आहे.


पोलादपूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील २००५ च्या अतिवृष्टीत खचलेला रस्ता दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ९० ते १०५ फूट लांब आणि २ ते ५ फूट खोल खचला असून तेथे उभा करण्यात आलेला प्रोकलेनदेखील गरजेनुसार हलविण्यात येत असून यावर्षी कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग सुरू झाल्याने या खचणाऱ्या डेंजरझोनकडे डागडुजी करण्यात अक्षम्य दिरंगाई करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

प्रवीण ठाकूर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

रायगडमध्ये काँग्रेसला मोठा झटका अलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या आगामी निवडणुकांच्या आधी राज्यात

मुरुडच्या काशिद समुद्रकिनारी पंचावन्न लाखाेंचा चरस जप्त

नांदगाव मुरुड : गुप्त बातमीदारामार्फत मुरुड पोलिसांना ३१ जुलै रोजी मिळालेल्या माहितीनुसार मुरुड तालुक्यातील

एनएमएमटी बस कर्जत पूर्वेकडून सुटण्यास सुरुवात

शहरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार विजय मांडे कर्जत : कर्जत पूर्वेकडील प्रवाशांसाठी आात बसची सुविधा उपलब्ध

पाली शहरात ३५ वर्षांनंतर अजूनही परिस्थिती ‘जैसे थे’

अष्टविनायक तीर्थक्षेत्राला शुद्ध पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा अशी आहे जाहीर सूचना दिनांक ६/२/१९९० सालचे हे

रायगड पोलिसांनी केला ‘डिजीटल अरेस्ट’ रॅकेटचा पर्दाफाश

३५ मोबाईलसह ६१७५ सिमकार्ड जप्त, ११ आरोपींना अटक अलिबाग : वयोवृद्ध नागरिकांना फसवण्यासाठी ‘डिजीटल अरेस्ट’च्या

वन-वे व्यवस्थेत बदल घडल्याशिवाय पर्यटन क्रांती अशक्यच; ग्रामस्थांच्या नाराजीचा सूर

माथेरानमध्ये वीज, पाणी, वाहतूकही होते एकाच मार्गाने; स्थानिकांसह, पर्यटक, विद्यार्थ्यांचेही हाल माथेरान : १८५०