सूर्याला तारा का म्हणतात?

  22

कथा : प्रा. देवबा पाटील


आदित्य व त्याच्या मित्रांचा एका गरीब पण हुशार व ज्ञानीविज्ञानी सुभाष नावाच्या मुलासोबत चांगला परिचय झाला होता. ते दररोज दुपारी शाळेच्या मधल्या सुट्टीत निंबाच्या झाडाखाली आपले डबे खात असताना सूर्याविषयी चर्चा करायचे, पण तो गरीब असल्याने थोडा दूरच बसत होता. आदित्यने आपुलकीने त्याला आपल्याकडे बोलावले. तो यांच्याजवळ येऊन बसायलाही तयार नव्हता. तरी आदित्य उठला व त्याने त्याला हात धरून आणले व आपल्या जवळ बसविले आणि आपल्या डब्यातील थोडीशी भाजी पोळी देत त्याला
“आमच्यासोबत जेवण कर” असे म्हणाला; परंतु सुभाष नाही
म्हणू लागला.


“दादा, मी तुमच्यासोबत जेवलो तर तुम्ही उपाशी नाही का राहणार? त्यापेक्षा तुम्ही जेवा पोटभर. मला रोजचीच उपाशी राहण्याची सवयच आहे.” सुभाष म्हणाला.
पण आदित्य त्याच्याशी खूप प्रेमाने बोलू लागला. “आमच्यातील एकेक घास तुला दिल्याने आम्ही काही उपाशी राहणार नाही. त्यातून तू मात्र पोटभर नाही जेवला तरी तुझे पोट थोडेफार तर भरेल. चल ये बस आमच्यासोबत जेवायला.” असा आदित्य त्याचा हात धरून पुन्हा त्याला खूपच आग्रह करू लागला.


त्यामुळे तो नाही नाही म्हणता म्हणता त्याच्या तोंडून हो शब्द निघाला. मग आदित्यने आपल्या डब्यातील थोडीशी पोळी- भाजी काढून त्याला दिली. ती पोळी-भाजी त्याने आपल्या भाकरीवर ठेवली. आदित्यचे बघून त्याच्या बाकीच्या मित्रांनीही तसेच केले. त्याने सर्वांनी दिलेली थोडीथोडी पोळी-भाजी घेतली. असे ते सारे मिळून गप्पागोष्टी करत जेवू लागले.


“सूर्याला तारा का म्हणतात?” पिंटूने प्रश्न केला.
“सूर्याची उष्णता इतकी प्रचंड आहे की, त्यापर्यंत कोणी पोहोचूच शकत नाही. त्याची उष्णता इतकी जास्त आहे की, त्याच्यापासून काही लाखो किलोमीटर अंतरावरच वस्तू जळून खाक होतात. मूळ महाकाय प्रचंड सूर्य ता­ऱ्याचा जेव्हा भयंकर मोठा असा स्फोट झाला होता तेव्हा त्या स्फोटाने त्याचे काही तुकडे झाले. त्या तुकड्यांपैकी सर्वांत मोठा मूळ तुकडा आपला आजचा सूर्य बनला व तो तसाच अतिशय उष्ण वायूंचा गोळाच राहिला. त्याच्या प्रचंड उष्णतेने त्याचा स्वत:चा प्रकाश निर्माण होतो म्हणजे त्याला स्वत:चा प्रकाश आहे, तो स्वयंप्रकाशित आहे म्हणूनच त्याला तारा म्हणतात.” सुभाष म्हणाला.


आजही शाळेची मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली व त्यांची चर्चा अपूर्णच राहिली व ते आपापल्या वर्गाकडे निघाले.

Comments
Add Comment

गणपतीची अनेकविध रूपं

डॉ. अंबरीष खरे : ज्येष्ठ अभ्यासक सध्या अवघे समाजमन गणेशोत्सवाच्या तयारीत गर्क आहेत. लवकरच नेहमीच्या उत्साहात

असा झाला गणेशाचा जन्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे हिंदू संस्कृतीत गणपती या देवतेला सर्वोच्च मान असून गणपती हा विघ्नहर्ता

‘तुमको ना भूल पाएंगे.’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सुमारे ९९ वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्मलेल्या श्रीष्टीनाथ

सर्वेपि सुखिनः सन्तु।

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, देश स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य

मुलांना चांगल्या सवयी कशा लावाल?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू लहानपणापासून मुलांना चांगल्या गोष्टी किंवा संस्कार दिल्यास भविष्यात हीच मुलं

प्रथम तुला वंदितो...

मनस्वीनी : पूर्णिमा शिंदे कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेने होते. असा हा पवित्र, मंगलमय,