काळू धरणातील विस्थापितांचे पुनर्वसन खापरी गावात नको

  10

स्थानिक ग्रामस्थांचे मुरबाड तहसीलदारांना निवेदन


मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातील काळू नदीवरील प्रस्तावित धरणग्रस्तांचे पुनर्वसन खापरी गावात नको अशी भूमिका खापरी ग्रामस्थांनी घेतली असून शासनाच्या या निर्णयावर आक्षेप घेत त्यांनी तहसिलदार यांना निवेदन दिले आहे.


मुरबाड, शहापूर तालुक्यातील खेडोपाड्यांसह दुर्गम भागातील वस्ती आजही पाण्यावाचून वंचित असून धरण उशाला तर कोरड घश्याला अशी जनतेची परिस्थिती झाली आहे. कोट्यावधींच्या जलजीवन मिशन योजनाही ठेकेदारांच्या घश्यात गेल्या असून प्रस्तावित काळू धरणाचा फायदा धनदांडगे आणि शहरांना होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. धरणाचा फायदा शहरांची तहान भागवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचा बळी घेतला जातो. कोयना, बारवी, तानसा, भातसा, ही धरण बांधून मुंबईकर पाणी पित आहेत. मात्र ज्यांच्यावर अन्याय झाला ते चाळीस पन्नास वर्ष न्यायासाठी झगडत आहेत. आता असाच घाट मुरबाड तालुक्यात काळु धरण बांधण्याचा घातला जात आहे. धरण परिसरातील गावे उध्वस्त होणारच आहेत. परंतू त्यांचे पूनर्वसन खापरी, बळेगांव, सायले इत्यादी गावात करून या गावांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय समतोल बिघडवण्याचे काम शासन करु पाहत आहे, अशी येथील ग्रामस्थांची भावना निर्माण झाली आहे. धरणात बाधीत होणाऱ्या गावांना धरण पाहिजे असेल तर जरूर करा पण, आमच्या गावात त्यांचे पूनर्वसन नको अशी भूमिका खापरी ग्रामस्थांची असून तसे निवेदन त्यांनी मुरबाड तहसीलदारांना दिले आहे.


काळू, शाई धरणात बाधित होणाऱ्या गावांचे पुनर्वसनाची यादी शासनाने प्रसिद्ध केली आहे. या यादीमुळे एकीकडे स्थलांतरित गावातील नागरिकांत संभ्रमाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे विस्थापितांचे पुनर्वसन खापरी, सायले, बळेगाव धरणाखालील गावात करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पण खापरी गावातील नागरिकांना शेती व्यतिरिक्त कोणताच व्यवसाय नाही. जोडव्यवसाय म्हणून प्रापंचिक खर्च भागवण्यासाठी दुग्धव्यवसाय केला जातो. अशा गावातील जमीन काळू धरणात विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी संपादित केल्यास खापरी येथील शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन हिरावणार असल्याने उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे काळू धरणातील बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन खापरी गावात नको, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून तशा प्रकारचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, अनेक कामगार बेपत्ता

डेहराडून : उत्तराखंडमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रौद्र रूप धारण केलेय. राज्याच्या

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल