दातांची बात 

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड


सुरुवातीला येतात
दुधाचे दात
हसता खेळता
ते पडून जातात

नंतर येतात ते
कायमचे दात
बत्तीस जणं मग
मिळून राहतात

हसतील त्याचे म्हणे
दिसतील दात
नका बसू कुणावर
दात ओठ खात

वय वाढलं की,
दात लागतात गळू
तोंडाचं बोळकं
सांगतंच हळू

आमच्या आजीची
बात आहे न्यारी
दातांची कवळी लावून
हसते जाम भारी.

म्हणते कशी आम्हाला
मुलं तुम्ही गुणी
दाताच्या कण्या करायला
लावू नका कुणी?
Comments
Add Comment

ऋषी लोमश

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे प्रदीर्घ दीर्घायुष्य लाभलेले महर्षी म्हणून पुराणात यांचा उल्लेख आहे.

विमा : हमी की फसवणूक?

संवाद : निशा वर्तक  “इन्शुरन्स काढा…, भविष्य सुरक्षित ठेवा…” हे वाक्य आपण किती सहज ऐकतो! आजारपण, अपघात,

नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे खूप पूर्वी भारतीय कुटुंबसंस्था अतिशय मजबूत होती. ती जवळजवळ अभेद्यच आहे असे

मित्र नको, बाबाच बना!

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू असे कोणते बाबा असतात का ज्यांना मुलांवर प्रेम करायला आवडत नाही. मुलांनी आपल्याला

महापालिकांत चुरस

विशेष : डॉ. अशोक चौसाळकर  महापालिका निवडणुकीमध्ये राज्यभरात जोरदार लढत रंगणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि

‌ध्रुव ६४ : भारताचे धुरंधर यश

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर भारताने स्वतःचे स्वदेशी मायक्रोप्रोसेसर विकसित करण्याच्या प्रवासातील एक