Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

दातांची बात 

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड

सुरुवातीला येतात दुधाचे दात हसता खेळता ते पडून जातात नंतर येतात ते कायमचे दात बत्तीस जणं मग मिळून राहतात हसतील त्याचे म्हणे दिसतील दात नका बसू कुणावर दात ओठ खात वय वाढलं की, दात लागतात गळू तोंडाचं बोळकं सांगतंच हळू आमच्या आजीची बात आहे न्यारी दातांची कवळी लावून हसते जाम भारी. म्हणते कशी आम्हाला मुलं तुम्ही गुणी दाताच्या कण्या करायला लावू नका कुणी?
Comments
Add Comment