शेफाली जरीवालाच्या मृत्यचं कारण अँटी एजिंग ट्रीटमेंट आहे का? समोर आलं सत्य...

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.शेफाली जरीवाल तरुणांच्या गळ्यातील ताईत होती. तिचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. आशा पारेख यांच्या 'कांटा लगा' या चित्रपटातील गाण्याचा म्युझिक व्हिडिओ २००२ मध्ये तिने रिक्रिएट केला. हे गाण 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात वापरल होत. शेफालीच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. सलमान खानच्या लोकप्रिय शो 'बिग बॉस १३' मध्ये तिने भाग घेतला होता. बिग बॉसच्या या घराने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. ती सध्या अंधेरी स्थित लोखंडवाला मध्ये राहत होती. शेफालीने शुक्रवारी (२७ जून २०२५) रात्री ११ वाजता छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तिचा पती तिला रुग्णालयात घेऊन गेला.परंतु दुर्दैवाने वयाच्या ४२ व्या वर्षी झालेल्या तिच्या अकाली निधनाने चाहते आणि मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

सध्या शेफालीच्या मृत्यूच्या कारणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे. शेफाली तिच्या मृत्यूपूर्वी पाच ते सहा वर्ष वृद्धत्वविरोधी उपचार घेत होती. अहवालात म्हटले आहे की या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ग्लूटाथिओनचा समावेश होता.परंतु एका डॉक्टरनी सांगितले की , "ग्लुटाथिओन हे त्वचा उजळवण्यासाठी आणि विषमुक्त करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. या औषधाचा हृदयावर थेट परिणाम होत नाही आणि हे पूर्णपणे कॉस्मेटिक उपचार आहेत."

शेफालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. शेफालीने ३ दिवसांपूर्वी एक फोटोशूट केले होते. नंतर ती घरीच होती. यामुळे शेफालीला नेमके काय झाले याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरातून नमुन्यांचे (सँपल्स) संकलन केले आहे. पोलिसांनी शेफाली ज्या इमारतीत राहत होती तिथले सुरक्षा रक्षक (वॉचमन), शेफालीचे शेजारी, शेफालीचा पती आणि शेफालीला रुग्णालयात नेत असताना तिच्यासोबत असलेल्या सर्वांची कसून चौकशी सुरू केली आहे. शेफालीच्या घरात काम करणाऱ्या नोकरांची आंबोली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
Comments
Add Comment

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर