Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Electricity Price : इलेक्ट्रिक वाहनधारकांच्या खिशाला कात्री, महावितरणाकडून दरवाढ होणार?

Electricity Price : इलेक्ट्रिक वाहनधारकांच्या खिशाला कात्री, महावितरणाकडून दरवाढ होणार?

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमतीला कंटाळून अनेक वाहनधारकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करायला सुरवात केली. आता इलेक्ट्रिक वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. १ जूलैपासून इलेक्ट्रिक वाहनधारकांना चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रतियुनिट वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ ५० पैशांहून अधिक असणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. महावितरण विभागाने दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नुकतेच वीज दर निश्चित करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे घरगुती वीज वापरत असलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यात आला असून विजेवरील वाहनांना पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात पुढील पाच वर्षे वाढ होत राहणार असल्याची शक्यता वर्तवण्याता आलेली आहे.

विशेष म्हणजे टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटी, बेस्ट इलेक्ट्रिसीटी, यांच्या तुलनेत महावितरणचे वीज दर जास्त असणार आहेत. सुरवातीला महावितरण यांच्याकडून प्रतियुनिटचा दर ८.४७ रुपये असून तो आता १ जुलैपासून ९.०१ रुपये एवढा होणार आहे.पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी इंधन आयात करावे लागत असून त्यासाठी परकीय चलनात वाढ होते. त्याची दखल घेत वीज आयोगाने पुढील पाच वर्षासाठी बहुवार्षिक वीज दर निश्चित करताना इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या प्रतियुनिट विजेचा दर सहा रूपये एवढा निश्चित केला होता. मात्र यंदाची दरवाढ पाहता आयोगाने प्रोत्साहन मोहिम गुंडाळल्याचे दिसत आहे..

         
Comments
Add Comment