श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई: गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वताच्या पाचव्या भागात श्री दत्तात्रेय भगवान यांचे तपश्चर्या स्थान आहे. दत्त भक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या या जागेवर गेल्या काही वर्षापासून दिगंबर जैन आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु गुजरात न्यायालयाने यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीत शांततेच्या मार्गाने फक्त दर्शन घेण्याचे निर्देश दिलेले असतानाही, दिगंबर जैन पंथाकडून दर्शनाच्या नावाखाली शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.


येत्या २ जुलै २०२५ रोजी जैन मंडळीकडून शक्ती प्रदर्शन झाल्यास धार्मिक तेढ निर्माण होउ शकतो. याबाबत स्थानिक प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करावी, असे आवाहन श्रीगुरु दत्तात्रेय गिरनार चॅरिटेबल ट्रस्टचे कैलास पुरोहित यांनी केले आहे.


गिरनार हे दत्तस्थान असून दत्त भगवान यांनी येथे १२ हजार वर्षे ध्यान केले होते आणि तेथून ते निराकार झाले. दत्तांनी गिरनार येथे त्यांच्या पाऊलखुणा सोडल्या. ज्यांची पूजा गुरू-शिष्य परंपरेनुसार अखंड चालू आहे. दर पौर्णिमेला दत्तभक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गिरनार वारीला येतात.


हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच पोहचविण्याचे काम काही जैन मंडळीकडून केले जात असल्याने महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील दत्तभक्त दुःखी झाले आहेत. त्यामुळे काही दत्त भक्तांनी स्वयंस्फुर्तीने मोठ्या संख्येने या हिंसक घटनेचा निषेध केला आहे.


गिरनार पर्वताचे पावित्र्य राखत शांतता पद्धतीने दर्शन व्हावे, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची हजारोंच्या संख्येने गिरनार पर्वतावर उपस्थित राहणार असल्याचे समजते. दरम्यान, दिगंबर जैन पंथाच्या दाव्यानुसार, येथील पाचवा भाग त्यांच्या श्री नेमिनाथ जींचा आहे.

Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५