Sunday, October 26, 2025
Happy Diwali

अजित पवारांच्या मुलापाठोपाठ पुतण्याचाही साखपुडा

अजित पवारांच्या मुलापाठोपाठ पुतण्याचाही साखपुडा
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी झाला. आता अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र याचाही साखरपुडा झाला. विधानसभेच्या निवडणुकीत युगेंद्र हा अजित पवारांच्या विरोधात उभा राहिला. होता. निवडणुकीत युगेंद्रचा पराभव झाला. पण अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवणारा उमेदवार म्हणून युगेंद्रची चर्चा झाली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्रच्या साखरपुड्याबाबत माहिती दिली आहे. युगेंद्र आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे फोटो व्हायरल होत आहेत. युगेंद्र पवारच्या पत्नीचे नाव तनिष्का प्रभू असे आहे. तनिष्काने परदेशातून फायनान्समध्ये उच्च शिक्षण घेतले आहे. युगेंद्र आणि तनिष्का यांचा साखरपुडा निवडक नातलगांच्या उपस्थितीत घरीच झाला. या साखपुड्याचे निवडक फोटो व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोत तनिष्का हातातील अंगठी दाखवताना दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी भाच्याला, युगेंद्रला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. युगेंद्र आणि तनिष्का आयुष्यभर आनंदी आणि एकत्र रहा, खूप खूप शुभेच्छा. पवार कुटुंबात तनिष्काचे स्वागत करताना आनंद होत आहे, असेही सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. याआधी जय अजित पवार यांचा साखरपुडा झाला त्यावेळीही सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे साखरपुड्याची माहिती सर्वांना दिली होती. पुण्यात १० एप्रिल २०२५ रोजी जय अजित पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा झाला होता. ऋतुजा पाटील ही साताऱ्यातील फलटणच्या सोशल मीडिया कंपनी सांभाळणाऱ्या प्रविण पाटील यांची मुलगी आहे. या साखरपुड्याच्या निमित्ताने वाद विसरुन मुलांच्या आनंदासाठी पवार कुटुंब एकत्र आले होते.
 
View this post on Instagram
 

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

Comments
Add Comment