शेफालीचा पती करतो काय ?

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेविश्वात सध्या शोककळा पसरली आहे.वयाच्या अवघ्या ४२ व्या  वर्षी शेफाईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सलमान खानच्या बिग बॉस  सीजन १३ मध्ये शेफाली होती. कांटा लगा या गाण्यामुळे शेफाली नावारूपास आली.ती सध्या अंधेरी स्थित लोखंडवाला मध्ये राहत होती.तिच्या स्वगृहीच ती मरण पावली. शेफालीने शुक्रवारी (२७ जून २०२५) रात्री ११ वाजता छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तिचा पती तिला रुग्णालयात घेऊन गेला.त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. तिचा पती तिला इस्पितळात नेताना दिसल्यापासून शेफालीचा नवरा नक्की कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. जाणून घेऊया कोण आहे शेफालीचा नवरा पराग त्यागी.

शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागी टीव्हीवर काम करणारा अभिनेता आहे. शेफाली आणि त्याच लग्न ऑगस्ट २०१४ मध्ये झाल होत. ४९ वर्षीय पराग त्यागीचा जन्म उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे झाला,त्याने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम करून नाव कमावल आहे. शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर परागनेच तिला इस्पितळात नेलं यावेळी त्यांचा कुत्रा सिम्बादेखील त्याच्यासोबत खाली फिरताना दिसला.

पराग त्यागीशी शेफालीची भेट एका मित्राच्या डिनर पार्टीत झाली. जिथे दोघेही प्रेमात पडले.त्यावेळी शेफालीने संगीतकार हरमीत सिंगला घटस्फोट दिला होता. शेफालीने पराग त्यागीला चार वर्षे डेट केले. २०१४ मध्ये या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला.पराग आणि शेफाली हे डान्स रिअलिटी शो नच बलिये सीझन ५ आणि ७ मध्येही दिसले होते.

पराग त्यागी आणि शेफाली कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले. मे २०२० मध्ये अभिनेत्याच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा कोरोना काळातदेखील दोघांनी अंत्यसंस्काराला हजेरी लावली.शेफालीने 'कांटा लगा'नंतर तिची मर्यादित केली तेव्हा परागने तिच्या मानसिक आरोग्याच्या संघर्षांनाही पाठिंबा दिला.
Comments
Add Comment

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक