Sunday, October 26, 2025
Happy Diwali

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी
दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेश तिसऱ्या आणि श्रीलंका चौथ्या स्थानी आहे. भारत पाचव्या आणि वेस्ट इंडिज सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका नव्या हंगामात अद्याप एकही कसोटी सामना खेळलेले नाहीत. ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज विरुद्धची पहिली कसोटी १५९ धावांनी जिंकली. इंग्लंड भारताविरुद्धची पहिली कसोटी पाच गडी राखून जिंकला. या विजयांमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड प्रत्येकी एक कसोटी सामना खेळल्यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. मोठ्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि मोठ्या पराभवामुळे वेस्ट इंडिज सहाव्या स्थानी आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामने झाले. यातील एक अनिर्णित राहिला तर दुसरा कसोटी सामना श्रीलंकेने ७८ धावांनी जिंकला. पण अनिर्णित सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद ४९५ धावा आणि दुसऱ्या डावात सहा बाद २८५ धावा केल्या. तर श्रीलंकेने पहिल्या डावात सर्वबाद ४८५ आणि दुसऱ्या डावात चार बाद ७२ धावा केल्या होत्या. नंतर दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने पहिल्या डावात सर्वबाद ४५८ धावा केल्या. बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद २४७ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद १३३ धावा केल्या होत्या. अनिर्णित कसोटीतील कामगिरीमुळे बांगलादेश गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी आणि श्रीलंका चौथ्या स्थानी आहे.
Comments
Add Comment