Sunday, August 3, 2025

श्रेयस तळपदे शेफाली जरीवालाची बातमी ऐकून हळहळला!

श्रेयस तळपदे शेफाली जरीवालाची बातमी ऐकून हळहळला!
मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत. शेफालीच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. सलमान खानच्या लोकप्रिय शो 'बिग बॉस १३' मध्ये तिने भाग घेतला होता. बिग बॉसच्या या घराने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. ती सध्या अंधेरी स्थित लोखंडवाला मध्ये राहत होती. शेफालीने शुक्रवारी (२७ जून २०२५) रात्री ११ वाजता छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तिचा पती तिला रुग्णालयात घेऊन गेला.परंतु वयाच्या ४२ व्या वर्षी झालेल्या तिच्या अकाली निधनाने चाहते आणि मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

अभिनेत्री आणि नृत्यांगना शेफाली जरीवाला हिच्या विषयी अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे.अभिनेता श्रेयस तळपदेने देखील एक दुःखद पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डल वरून शेयर केली आहे. 'शेफाली, हे हृदयद्रावक आहे आणि विश्वास यावर ठेवण खूप कठीण आहे.तुझ्या प्रियजनांना हे दुःख सहन करण्याचं बळ मिळो. तुझी खूप आठवण येईल'.अशा आशयाची पोस्ट लिहीत त्याने शेफाली जरीवालाचा फोटो शेअर केला आहे.

अभिनेता श्रेयस तळपदेला देखील डिसेंबर २०२३ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती.‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रेयसला अचानक अस्वस्थ वाटू लागलं होतं.एका मुलाखतीत श्रेयस म्हणाला कि “माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की कोविडनंतर त्यांनी अशा घटनांमध्ये वाढ पाहिली आहे. कारण रक्त घट्ट होऊ लागलं आहे. रक्त घट्ट झाल्याने त्यापासून गुठळी तयार होऊ लागते. माझ्या केसमध्ये शारीरिक थकवा वाढल्याने आणि शरीरावर अधिक ताण आल्याने ती गाठ फुटली. त्यामुळे ब्लॉकेज निर्माण झाले. हा एखाद्या अपघातासारखा होता आणि हे सर्व अचानकच घडलं होतं. पण त्या परिस्थितीतून मला सुखरुप बाहेर काढल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.”वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यातून अभिनेता श्रेयस तळपदे वाचला होता.

आता अभिनेत्री अभिनेत्री शेफाली जरीवालाला हृदयविकाराचा झटका कशामुळे आला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा