Shefali Jariwala Death: ज्याचा विचार करत होती, त्याच्यासारखेच मरण आलं! शेफालीची 'ती' पोस्ट व्हायरल

EX बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाबाबत शेफालीची शेवटची पोस्ट व्हायरल 


'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी अचानक निधन झाले. तिच्या  अकाली निधनाने चाहते आणि मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.  मात्र या दरम्यान शेफालीच्या एक्स (पूर्वी ट्विटर) वरील तिची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट बिग बॉस १३ चा विजेता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्ला याबाबत होती. योगायोग म्हणजे काही वर्षांपूर्वी सिद्धार्थ शुक्लाचा देखील याचप्रकारे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळेच शेफालीची सिद्धार्थ बद्दलची शेवटची पोस्ट तिच्या मृत्यूच्या बातमीनंतर चर्चेचा विषय ठरत आहे.


बिग बॉस शोचा तेरावा सीझन जिंकणारा सिद्धार्थ २०२१ मध्ये अशाच परिस्थितीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावला होता. त्याच्या पुण्यतिथीनिमित्त, शेफाली जरीवालाने बिग बॉसच्या कारकिर्दीदरम्यान दोघांचा उबदारपणे मिठी मारतानाचा एक जुना फोटो शेअर केला आणि लिहिले, "आज तुझा विचार करत आहे, फक्त मित्रा @sidharth_shukla." तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.





कोण आहे शेफाली जरीवाला?


शेफाली जरीवाला हिचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये झाला होता. ती अनेक रिअॅलिटी शोज, चित्रपट, गाण्यांच्या अल्बममध्ये दिसून आली होती.  त्यामधील तिचा 'कांटा लगा' हा अल्बम रातोरात प्रसिद्ध झाला, आणि तिला 'कांटा लगा गर्ल' अशी ओळख मिळाली. शेफालीने नच बलिए ५ आणि नच बलिए ७ मध्येही सहभाग घेतला होता. २०१९ मध्ये बिग बॉस १३ मध्येही स्पर्धेक म्हणून शेफाली दिसली होती. ज्यात सिद्धार्थ शुक्आलासोबत तिचे पूर्वीचे नाते उघड झाले होते.



व्यक्तिगत आयुष्य चर्चेत


शेफाली जरीवालाचे दोन लग्न झाले होते. तिचे पहिले लग्न २००४ मध्ये मीत ब्रदर्सचे संगीतकार हरमीत सिंग यांच्याशी झाले होते, परंतु २००९मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१५ मध्ये शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले.

Comments
Add Comment

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक