Thursday, October 2, 2025

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेचा रविवार २९ जून २०२५ रोजी मेगाब्लॉक आहे. ब्लॉक काळात उपनगरीय रेल्वे सेवेच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे. अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्यांच्या मार्गात फेरबदल करण्यात आले आहेत. गाड्या नियोजीत वेळेच्या तुलनेत काही मिनिटे उशिराने धावतील. यामुळे प्रवाशांनी मेगाब्लॉक काळातील वेळापत्रकाची माहिती घेऊन नंतर प्रवासाचे नियजन करणे हिताचे आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी मध्यरात्रीच वसई रोड ते वैतरणादरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक नसेल. मध्य रेल्वे, मुख्य मार्ग - ठाणे ते कल्याण जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावर - सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० मेगाब्लॉक ब्लॉक काळात ठाणे ते कल्याण जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील. काही गाड्या २० मिनिटे उशिराने धावतील. हार्बर रेल्वे मार्ग - पनवेल ते वाशी - जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर - सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ मेगाब्लॉक - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूरदरम्यान, ठाणे ते पनवेलदरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान आणि खारकोपर मार्गावर लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत. ब्लॉक वेळेत हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >