Parag Tyagi trolled: शेफालीच्या मृत्युला २४ तास उलटत नाही, तोच पती पराग... युजर्सने केले ट्रोल

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर लगेचच पराग त्यागी कुत्र्यासोबत फिरताना दिसला


Parag Tyagi Was Seen Walking With Dog: शेफाली जरीवालाचा काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.  तिच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण हिन्दी सिनेसृष्टी हळहळली. अनेकांनी तिच्या जाण्याचा शोक व्यक्त केला, पण या दरम्यान तिचा पती पराग त्यागीने असे काही केले आहे की, ज्यामुळे तो ट्रोलर्सच्या रडारवर आला आहे. शेफालीच्या मृत्यूनंतर लगेचच पराग त्याच्या पाळीव कुत्र्या 'सिम्बा'ला फिरवताना दिसला. पत्नीच्या मृत्यूला काही तास उलटत नाही, तोच परागचे असे वागणे अनेकांना पटलेलं नाही. त्यामुळे त्याला युजर्सने प्रचंड प्रमाणात ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

छोट्या पडद्यावर आणि चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाचे २७ जूनच्या मध्यरात्री मुंबईत निधन झाले. असे म्हटले जात आहे की तिला हृदयविकाराचा झटका आला होता, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही. अशा परिस्थितीत, अभिनेत्रीच्या मृत्यूचे खरे कारण देखील स्पष्ट झालेले नाही. शेफालीला रात्री उशिरा तिचा पती पराग त्यागी आणि इतर तिघेजण बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच तिचा  मृत्यू झाला. यानंतर, तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. रात्री उशिरा हॉस्पिटलमधून बाहेर पडताना परागचा एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये तो गाडीत बसून निघून जाताना दिसत होता. 

त्यानंतर, दुसऱ्या दिवशी (२८ जून) सकाळी शेफाली जरीवालाच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरली. या बातमीमुळे संपूर्ण बॉलीवूड आणि प्रेक्षक हळहळले. यादरम्यान तिचा पती पराग त्यागीविषयी अनेकांनी सद्भावना व्यक्त केल्या. मात्र तिच्या मृत्यूच्या काही तासांनंतरच पराग त्याच्या पाळीव कुत्र्या सिम्बाला त्याच्या इमारतीबाहेर फिरवत असल्याचे दिसून आले. ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.

शेफालीच्या मृत्यूनंतर लगेचच पाळीव कुत्र्याला बाहेर फिरवतानाचा पराग त्यागीचा हा व्हिडिओ पाहून लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. कारण त्याने असे करणे कुणालाच अपेक्षित नव्हते.

सोशल मीडिया हँडलवर परागचा व्हिडिओ व्हायरल


अनेक पापाराझींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर परागचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या पाळीव कुत्र्या सिम्बाला फिरवत असल्याचे दिसून आले. यादरम्यान, शेफालीचा हातात एक फोटो देखील दिसला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. कोणीतरी लिहिले की "तो ठीक आहे आणि त्याला काही फरक पडत नाही." यानंतर आणखीन एका युजर्स लिहिले की "तो इतका रिलॅक्स कसा राहू शकतो".

रश्मी देसाईने ट्रोलर्सला सुनावले 


छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि शेफाली जरीवालाची बिग बॉस १३ ची सह स्पर्धक रश्मी देसाईने पराग त्यागीला ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे. तिने परागची बाजू घेत ट्रोलर्सना गप्प बसायला सांगितले. रश्मीने तिच्या सोशल मीडिया हँडल इंस्टाग्राम स्टोरीवर परागचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "अरे भय्या,  जज करण्याऐवजी दया आणि करुणा पसरवा. सिम्बा हा फक्त एक पाळीव प्राणी नाही, तो शेफालीचा लाडका मुलगा होता. तिच्या अचानक निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि मी माध्यमांना कुटुंबाच्या दुःखाचा आदर करण्याची आणि या कठीण काळात त्यांना स्पेस देण्याची विनंती करते. आपण सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवूया, द्वेष नाही." रश्मीने या पोस्टच्या आधी शेफालीला श्रद्धांजली वाहणारी एक पोस्ट शेअर केली होती. रश्मीने त्यात लिहिले, "मी अजूनही ही बातमी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तू एक अविश्वसनीय व्यक्ती होतीस आणि मला शब्द व्यक्त करणे कठीण जात आहे. तुझी आठवण येईल, खूप लवकर निघून गेलीस."
Comments
Add Comment

महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे ‘बिग बॉस१९’च्या घराचा नवा कॅप्टन !

मुंबई : ‘बिग बॉस १९’ रिऍलिटी शो चांगलाच गाजत आहे. रोज नवे वाद,प्रेम आणि राजकारण या शो मध्ये पाहायला मिळतंय. याच शो

गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत यांचं नेमकं चाललंय तरी काय?

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात सध्या एक नव्या जोडीची चर्चा रंगली आहे ‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि लोकप्रिय

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा : ‘अभंग तुकाराम’

मुंबई : महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या

साईबाबांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती गंभीर, उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. सेप्टिक

‘द फॅमिली मॅन ३’ लवकरच प्रेक्षकांसमोर; प्राइम व्हिडिओने केली अधिकृत घोषणा

मुंबई : प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतीक्षेनंतर अखेर प्राइम व्हिडिओने बहुचर्चित आणि सुपरहिट वेब सिरीज ‘द फॅमिली

संजय मिश्रांनी ६२ व्या वर्षी महिमा चौधरीशी केला विवाह ?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी ही पुन्हा एकदा सिनेविश्वात सक्रिय झाली आहे. सध्या सोशल मीडियावर महिमा