'कांटा लगा...' फेम शेफालीचे निधन, घरी पोहोचली फॉरेन्सिक टीम

  55

मुंबई : तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे ती लोकप्रिय झाली होती. शेफालीच्या मृत्यूनंतर थोड्याच वेळात तिच्या घरी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे. मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरातून नमुन्यांचे (सँपल्स) संकलन करत आहे. बॉलिवूड फोटोग्राफर विरल भैयानीने सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडीओ शेअर करुन ही माहिती दिली आहे.



शेफाली जरीवाल तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होती. तिचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. तिला एका गाण्याने रातोरात लोकप्रिय केले. आशा पारेख यांच्या 'कांता लगा' या चित्रपटातील गाण्याचा म्युझिक व्हिडिओ २००२ मध्ये तिने रिक्रिएट केला. हे गाणे 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात वापरले होते. युट्यूबवर त्याला सुमारे १०० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. जेव्हा हे गाणे आले तेव्हा त्याला खूप लोकप्रियता मिळाली आणि त्याला विरोधही सहन करावा लागला. शेफालीचा हा व्हिडिओ इतका हिट झाला की तिची ओळख 'कांटा लगा गर्ल' अशी झाली. तिने सलमान खानच्या लोकप्रिय शो 'बिग बॉस १३' मध्येही भाग घेतला. तिने तिच्या कारकिर्दीतील एकमेव हिंदी चित्रपट 'मुझसे शादी करोगी' केला. त्याच वेळी ती 'हुडुगारू' नावाच्या कन्नड चित्रपटाचा भाग होती.

अंधेरीच्या लोखंडवाला भागात राहणाऱ्या शेफालीने शुक्रवारी (२७ जून २०२५) रात्री ११ वाजता छातीत दुखत असल्याची तक्रार केली. शेफालीचा पती पराग त्यागी याने तिला जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करताच शेफालीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर शेफालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. शेफालीने ३ दिवसांपूर्वी एक फोटोशूट केले होते. नंतर ती घरीच होती. यामुळे शेफालीला नेमके काय झाले याचा तपास सुरू आहे. शेफालीच्या घरी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे.
Comments
Add Comment

प्रार्थना बेहरेच्या पायाला मोठी दुखापत: गुडघ्याची शस्त्रक्रिया, काही आठवड्यांसाठी बेड रेस्ट

मुंबई: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेला मोठी दुखापत झाली असून तिच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'अल्याड पल्याड’ पुन्हा चित्रपटगृहात

मुंबई : सध्या जुने चित्रपट पुनः प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना

‘ऑल इज वेल’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन मित्रांची धमाल दाखविणारा ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट

Ladki Bahin Yojna Film: लाडकी बहीण योजना आता मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी 'लाडकी बहीण' सिनेमाच्या मुहूर्ताचा दिला क्लॅप मुंबई: महाराष्ट्र राज्यातील

'ऑल इज वेल' चित्रपटात सयाजी शिंदे यांचा मराठी बाणा

मुंबई : मराठी भाषा वळवावी तशी वळते, असं म्हणतात. मराठी भाषेचा गोडवा हा जितका शब्दांत असतो तितकाच तो माणसाच्या

'ऊत' चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर

मुंबई :  व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित