Shefali Jariwala Passes Away: अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हृदयविकाराने निधन

Shefali Jariwala Passes Away due to Cardiac Arrest: 'कांटा लगा' या गाण्याने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि नृत्यांगना शेफाली जरीवालाचे निधन झाले आहे.  तिचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.


बिग बॉसची स्पर्धक राहिलेली शेफालीच्या निधनाची बातमीमुळे सोशल मीडियावर सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिला हृदयविकाराचा झटका आला होता, तिला मृतावस्थेत मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (अंधेरी) येथे आणण्यात आले होते. ही बातमी प्रथम ज्येष्ठ चित्रपट समीक्षक विकी लालवाणी यांनी शेअर केली आणि आता बिग बॉसचे स्पर्धक राजीव अदातिया, अली गोनी आणि मिका सिंग यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


विकी लालवानी यांनी इनस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की शेफाली जरीवाला यांना त्यांचे पती आणि इतर ३ जण रुग्णालयात घेऊन आले होते.  "शेफालीला रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आले होते. वाटेतच तिला हृदयविकाराचा झटका आला किंवा तिचा मृत्यू इतर कोणत्याही कारणाने झाला."


हाती आलेल्या माहितीनुसार अंधेरी लोखंडवाला भागात राहणारी शेफाली रात्री ११ वाजता आजारी पडली. छातीत दुखू लागल्याने तिचे पती पराग त्यागी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले, जिथे पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आले. सध्या तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शेफालीने ३ दिवसांपूर्वी एक फोटोशूटही केले होते. 



एका गाण्याने तिला रातोरात लोकप्रिय केले


शेफाली जरीवाल तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होती. तिचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. तिला एका गाण्याने तिला रातोरात लोकप्रिय केले.  २००२ मध्ये तिने आशा पारेख यांच्या 'कांता लगा' या चित्रपटातील गाण्याचा म्युझिक व्हिडिओ रिक्रिएट केला. हे गाणे 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात वापरले गेले होते. युट्यूबवर त्याला सुमारे १०० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. जेव्हा हे गाणे आले तेव्हा त्याला खूप लोकप्रियता मिळाली आणि त्याला विरोधही सहन करावा लागला. शेफालीचा हा व्हिडिओ इतका हिट झाला की तिची ओळख 'कांटा लगा गर्ल' अशी झाली.


तिने सलमान खानच्या लोकप्रिय शो 'बिग बॉस १३' मध्येही भाग घेतला. तिने तिच्या कारकिर्दीतील एकमेव हिंदी चित्रपट 'मुझसे शादी करोगी' केला. त्याच वेळी ती 'हुडुगारू' नावाच्या कन्नड चित्रपटाचा भाग होती.


शेफालीच्या जवळच्यांना आणि चाहत्यांना ही बातमी कळताच धक्का बसला आहे. गायक मिका सिंगने शेफालीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्याने शेफालीचा फोटो शेअर करत लिहिले आहे- मला याचा धक्का बसला आहे आणि माझे मन खूप जड झाले आहे. आमची लाडकी कलाकार आणि माझी प्रिय मैत्रीण शेफाली जरीवाला आपल्याला सोडून गेली आहे.



Comments
Add Comment

संजय मिश्रांनी ६२ व्या वर्षी महिमा चौधरीशी केला विवाह ?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी ही पुन्हा एकदा सिनेविश्वात सक्रिय झाली आहे. सध्या सोशल मीडियावर महिमा

मराठी चित्रपटांना दाक्षिणात्य टच ; आफ्टर ऑपेरेशन 'लंडन कॅफे'मध्ये झळकणार हे कलाकार

मुंबई : 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या चित्रपटाची काही काळापासून चर्चा सुरू आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं

मल्टिप्लेक्स तिकिटदर १०० ते १५० रुपये ठेवण्याची मागणी ; मंत्रालयात चित्रपट संघटनेची बैठक

मुंबई : राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी कायमस्वरूपी स्क्रीन राखून ठेवावी आणि तिकिट दर

कंगना रणौतला कोर्टाचा दिलासा, वादग्रस्त प्रकरणातून जामीन मंजूर

मुंबई : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिला वादग्रस्त ट्वीट प्रकरणी कोर्टानं दिलासा दिला आहे. देशात

ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर ‘कांतारा- चैप्टर 1’ या तारखेला दिसणार ओटीटीवर!

मुंबई : ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा- चैप्टर 1’ आता लवकरच ओटीटीवर येणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये

'ह्युमन कोकेन' हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर लवकरच होणार रिलीज ! पुष्कर जोगचा नवा प्रयोग

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचित पाहिलेलं, वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा मिटवणारं जग आता पडद्यावर येणार