‘कांटा लगा…’ फेम शेफालीचे निधन, पोलीस तपास सुरू

मुंबई : तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे ती लोकप्रिय झाली होती. शेफालीच्या मृत्यूनंतर थोड्याच वेळात तिच्या घरी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे. मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरातून नमुन्यांचे (सँपल्स) संकलन केले.

शेफाली जरीवाल तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होती. तिचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. तिला एका गाण्याने रातोरात लोकप्रिय केले. आशा पारेख यांच्या 'कांता लगा' या चित्रपटातील गाण्याचा म्युझिक व्हिडिओ २००२ मध्ये तिने रिक्रिएट केला. हे गाणे 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात वापरले होते. युट्यूबवर त्याला सुमारे १०० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. जेव्हा हे गाणे आले तेव्हा त्याला खूप लोकप्रियता मिळाली आणि त्याला विरोधही सहन करावा लागला. शेफालीचा हा व्हिडिओ इतका हिट झाला की तिची ओळख 'कांटा लगा गर्ल' अशी झाली. तिने सलमान खानच्या लोकप्रिय शो 'बिग बॉस १३' मध्येही भाग घेतला. तिने तिच्या कारकिर्दीतील एकमेव हिंदी चित्रपट 'मुझसे शादी करोगी' केला. त्याच वेळी ती 'हुडुगारू' नावाच्या कन्नड चित्रपटाचा भाग होती.

अंधेरीच्या लोखंडवाला भागात राहणाऱ्या शेफालीने शुक्रवारी (२७ जून २०२५) रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केली. शेफालीचा पती पराग त्यागी याने तिला जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करताच शेफालीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर शेफालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. शेफालीने ३ दिवसांपूर्वी एक फोटोशूट केले होते. नंतर ती घरीच होती. यामुळे शेफालीला नेमके काय झाले याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरातून नमुन्यांचे (सँपल्स) संकलन केले आहे. पोलिसांनी शेफाली ज्या इमारतीत राहत होती तिथले सुरक्षा रक्षक (वॉचमन), शेफालीचे शेजारी, शेफालीचा पती आणि शेफालीला रुग्णालयात नेत असताना तिच्यासोबत असलेल्या सर्वांची कसून चौकशी सुरू केली आहे. शेफालीच्या घरात काम करणाऱ्या नोकरांची आंबोली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
Comments
Add Comment

इन्स्टा स्टार मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार ?

नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यातच उमेदवार म्हणून मिथिलामधून

आधी साठ कोटी जमा करा, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

व्यावसायिक राज कुंद्रा आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी या दोघांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा

'दशावतार' चित्रपटाचे रिषभ शेट्टीने केले कौतुक! म्हणाला, असे चित्रपट पुढील पिढीसाठी दस्ताऐवज आहेत

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी सध्या आपल्या कांतारा चॅप्टर १ या नवीन चित्रपटामुळे

रेणुका शहाणेचा ५९ वा वाढदिवस, दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा!

मुंबई : सलमान खानसोबत पहिल्यांदाच सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी मराठी

कांतारा चॅप्टर १ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात जबरदस्त कमाई

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी

दुर्गा ऑफ अल्ट्रा झकास, ओटीटीवर स्त्रीशक्तीचा उत्सव

दुर्गा ऑफ अल्ट्रा झकास – नवरात्रीत मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीशक्तीच्या नऊ रूपांचा अल्ट्रा झकास ओटीटीवर