IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली


नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती मंधानाने शनिवारी (२८ जून) इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर असून, इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज रंगला. ज्यात स्फोटक फलंदाज स्मृति मानधनाने शतक झळकावत मैदान गाजवले.  


इंग्लंडविरुद्ध आजच्या सामन्यात स्मृती मंधानाने ६२ चेंडूत ११२ धावा केल्या आहेत, अशाप्रकारे तिची महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी हरमनप्रीत कौरच्या नावावर पहिले शतक आहे. २०१८ च्या महिला टी-२० विश्वचषकात हरमनप्रीत कौरने १०३ धावा केल्या आहेत. 


त्याचप्रमाणे, स्मृती मंधाना तिन्ही स्वरूपात शतक झळकावणारी पहिली भारतीय आणि जगातील पाचवी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी हीदर नाइट, टॅमी ब्यूमोंट, लॉरा वोल्वार्ड आणि बेथ मूनी यांनीही तिन्ही स्वरूपात शतके झळकावली. मानधनाचे हे १४ वे आंतरराष्ट्रीय शतक होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावे ११ शतके आहेत, जो भारतासाठी एक विक्रम आहे. 



५ विकेटसाठी २१० धावा


मंधानाच्या खेळीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेटसाठी २१० धावा केल्या. टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा हा दुसरा सर्वोत्तम स्कोअर आहे. २०२४ मध्ये मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध ४ विकेटसाठी २१७ धावा हा सर्वोत्तम स्कोअर आहे. मंधानाने पहिल्या चेंडूपासून आक्रमक दिसली आणि तिला सलामीची जोडीदार शेफाली वर्माने साथ देण्याचा प्रयत्न केला.



शेफालीसोबत ५२ चेंडूत ७७ धावांची सलामी भागीदारी


मंधानाने शेफालीसोबत ५२ चेंडूत ७७ धावांची सलामी भागीदारी केली, मात्र शेफाली २२ चेंडूत २० धावा करत बाद झाली.  त्यानंतर हरलीन देओलसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूत ९४ धावांची भागीदारी केली. हरलीनने तिला चांगली साथ दिली आणि मात्र २६ धावांवर ऑफ-स्पिनर एलिस कॅप्सीच्या गोलंदाजीवर डॅनी व्याट-हॉजने तिला बाद केले.



कर्णधार हरमनप्रीत दुखापतीमुळे संघाबाहेर


भारतीय महिला क्रिकेट संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत आजच्या सामन्यात खेळू शकली नाही. सराव सामन्यादरम्यान डोक्याला दुखापत झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिला विश्रांती देण्यात आली असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नाणेफेकीच्या वेळी जाहीर केले. त्यामुळे स्मृती मानधनाने आजच्या सामन्यात कार्यवाहक कर्णधाराची धुरा सांभाळली. 

Comments
Add Comment

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर