
आज मुंबई, पुण्यासह अनेक प्रमुख शहरांत २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दर ९७४२ रुपये आहे. दिल्लीत मात्र दर प्रति ग्रॅम ९८५७ रूपये आहे दिल्ली, बडोदा, अहमदाबाद वगळता इतरत्र किंमत ९७४२ रूपये प्रति ग्रॅम कायम आहे. मुंबई पुण्यासह बहुतांश शहरात २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ८९३० रूपये तर १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७३६० रूपये आहे. एमसीएक्सवरील सोन्याचा निर्देशांक १.६१% घसरला होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये काल १.३६% घसरण झाली होती. सोन्याच्या दरात २७ जूनला चार आठवड्यातील सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. स्पॉट गोल्ड (Spot Gold) निर्देशांकात काल १% घसरण झाली होती ज्यामुळे दर ३२९३ डॉलर प्रति औंसवर गेले होते, जे २ जूननंतर सर्वाधिक घसरलेले दर आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या निर्देशांकात २% घसरण झाली आहे. ही मोठी घसरण मानली जाते.
काल सोने सातत्याने घसरले?
इस्त्राईल व इराण यांच्यातील युद्धाविराम करून अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी मध्यस्थी केली होती. ज्याचा मोठा फायदा अमेरिकन बाजारातील परिस्थितीवर झाला. पर्यायाने त्याचा फायदा भारतीय व आशियाई बाजारात झाला होता. मध्यपूर्वे कडील युद्धविरामानंतर सोन्याच्या मागणीतही मोठी घट झाली होती. संकटाची परिस्थिती नसल्यामुळे सोन्याच्या पुरवठ्यात कुठलीही अडचण नव्हती. उलट यापूर्वी मागणीतही वाढ झाली असताना लोकांनी सोन्याऐवजी चांदीकडे लक्ष केंद्रित केले होते. परंतु युद्धविराम झाल्यानंतर सोन्यातील दराप्रमाणे चांदी व कच्च्या तेलाच्या दरातही घसरण झाली. कच्च्या तेलाच्या निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे व डॉलर घसरल्यानंतर त्याची काही प्रमाणात झळ सोन्यालाही बसली आहे.
याशिवाय अमेरिकन बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात इतक्यात कपात शक्य नसल्याचे जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा ओघ इतर राष्ट्रांतील गुंतवणूकीकडे आहे. अशाच परिस्थितीत गुंतवणूकदार अमेरिकेतील पीसीई निर्देशांकात घातल्या ने सोन्याकडे दुर्लक्ष झाले आहे.आगामी काळात पीसीई आकडेवारीनंतर बाजाराची पुढील दिशा कळणार आहे. या आठवड्यात फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी काँग्रेससमोर हजेरी लावल्यानंतर हे घडले आहे. त्यांनी व्याजदरात लवकर कपात करण्याविरुद्ध इशारा दिला होता तसेच जकातींमुळे होणारी महागाई सुरुवातीच्या अपेक्षेपेक्षा जास्त काळ टिकू शकते असा इशारा दिला होता.
ट्रम्प यांनी पॉवेलवर कडक टीका करत म्हटले की त्यांच्या जागी 'तीन किंवा चार लोक' विचाराधीन आहेत. अहवालात म्हटले आहे की, ट्रम्प सप्टेंबरमध्ये पॉवेलच्या जागी नवीन व्यक्तीची निवड करू शकतात. आजचा सोन्याचा दर ९४४२० रू पयांच्या निचांकी पातळीवर गेला आहे. शुक्रवारी ब्युरो ऑफ इकॉनॉमिक अनालिसिसच्या आर्थिक आकडेवारीवरून असे दिसून आले की मे महिन्यातील वैयक्तिक वापर खर्च (Personal Consumption Expenditure PCE) निर्देशांक, फेडरल रिझर्व्हचा पसंतीचा महागाई मापन, दरवर्षी २.३% वाढला, जो एप्रिलच्या २.१% पेक्षा जास्त होता जो अंदाजानुसार होता कोर पीसीई जो अस्थिर अन्न आणि ऊर्जेच्या २.५% वरून २.७% वर पोहोचला आणि २.६% एकमत अंदाज ओ लांडला गेला होता.