बिग बॉसचं शापित घर... शेफालीच्या आधी सुद्धा झालं होत सहा स्पर्धकांचा अकस्मात निधन...

अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला 'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धीस पावली होती.सलमान खानच्या लोकप्रिय शो 'बिग बॉस १३' मध्ये तिने भाग घेतला होता.बिग बॉसच्या या घराने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. परंतु वयाच्या ४२ व्या वर्षी झालेल्या तिच्या अकाली निधनाने चाहते आणि मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. शेफाली प्रमाणेच या आधी सुद्धा बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या सहा कलाकारांचं अकस्मात निधन जहाल होत. नक्की हे स्पर्धक कोण होते जाणून घेऊया.

 

सिद्धार्थ शुक्ला:
बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याच २०२१ मध्ये वयाच्या ४० व्या वर्षी अकस्मात निधन झालं.सिद्धार्थ शुक्ला शेफाली जरीवाराचा एक्स बॉयफ्रेंड होता. योगायोग म्हणजे काही वर्षांपूर्वी सिद्धार्थ शुक्लाचा देखील याचप्रकारे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

प्रत्युषा बॅनर्जी:
बिग बॉस ७ स्पर्धक प्रत्युषा बॅनर्जीने २०१६ मध्ये वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी आत्महत्या केली.तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अनेक प्रेक्षकांची मन जिंकली होती तिच्या अश्या मृत्यूने प्रेक्षक हळहळले होते.

 

स्वामी ओमसोनाली फोगाट:

'बिग बॉस १४' ची स्पर्धक असणारी भाजपा नेता स्वामी ओमसोनाली फोगाटच वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्यातील ऊर्जा आणि दृढ निश्चयाने अनेकांना प्रेरित केलं होत. तिच्या अचानक जाण्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता.

 

सोमदास चट्टनूर:
'बिग बॉस १' मल्याळमचा स्पर्धक सोमदास चट्टनूरचा कोविडमुळे मृत्यू झाला. त्याच्या दयाळू स्वभावामुळे आणि प्रेमळ हास्यामुळे त्याने मल्याळम प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्याच्या मृत्यूमुळे कोविड महामारीच्या प्रभावाला अधोरेखित केलं.

जयश्री रमैय्या:
'बिग बॉस ३' कन्नड सीजनची स्पर्धक जयश्री रमैय्याने २०२० मध्ये आत्महत्या केली. तिच्या उत्साही स्वभावाने सर्वांची मन जिंकली होती. तिच्या मृत्यूच्या बातमीने सर्वच स्तबद्ध झाले.

हे सर्व स्पर्धक जरी जग सोडून गेले असतील तरी सर्व प्रेक्षकांच्या मनात जिवंत कायम राहतील.
Comments
Add Comment

महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे ‘बिग बॉस१९’च्या घराचा नवा कॅप्टन !

मुंबई : ‘बिग बॉस १९’ रिऍलिटी शो चांगलाच गाजत आहे. रोज नवे वाद,प्रेम आणि राजकारण या शो मध्ये पाहायला मिळतंय. याच शो

गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत यांचं नेमकं चाललंय तरी काय?

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात सध्या एक नव्या जोडीची चर्चा रंगली आहे ‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि लोकप्रिय

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा : ‘अभंग तुकाराम’

मुंबई : महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या

साईबाबांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती गंभीर, उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. सेप्टिक

‘द फॅमिली मॅन ३’ लवकरच प्रेक्षकांसमोर; प्राइम व्हिडिओने केली अधिकृत घोषणा

मुंबई : प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतीक्षेनंतर अखेर प्राइम व्हिडिओने बहुचर्चित आणि सुपरहिट वेब सिरीज ‘द फॅमिली

संजय मिश्रांनी ६२ व्या वर्षी महिमा चौधरीशी केला विवाह ?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी ही पुन्हा एकदा सिनेविश्वात सक्रिय झाली आहे. सध्या सोशल मीडियावर महिमा