Saturday, October 25, 2025
Happy Diwali

विजय देवरकोंडावर होणार पोलीस कारवाई ?

विजय देवरकोंडावर होणार पोलीस कारवाई ?
  दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा नेहमीच त्याच्या अनोख्या अंदाजामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. आता मात्र हा अभिनेत्याचं नाव वेगळ्याच कारणासाठी वायरल होत आहे.त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागण्याची दाट शक्यता आहे कारणही तसच खास आहे. अभिनेता विजय देवरकोंडाने आदिवासी समूहाबद्दल वादग्रस्थ विधान केले आहे. आदिवासी समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी २६ जून रोजी सिरोंचा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आदिवासी समाजाबद्दल हे वादग्रस्त विधान करून त्याने त्यांच्या भावना दुखावल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. एप्रिलमधील पहलगाम हल्ल्यानंतर त्याने आदिवासी समाजाबद्दल वक्तव्य केलं. सिरोंचा पोलीस ठाण्यात जाऊन तेथील नगरसेवक सतीश भोगे यांनी तक्रार नोंदवून अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अस्ट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवावा अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. तक्रार करताना रवी सुलतान,शंकर बंदेला, सुरेश गादाम उपस्तिथ होते. "तक्रार आली आहे, याबाबत वरिष्ठांना कळवलं आहे.या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने काय कारवाई करायची हा निर्णय वरिष्ठांना विचारून घेण्यात येईल."असं सिरोंचा ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी म्हटल आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा