शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात कोणते प्रयोग करणार ?

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक : शुभांशू शुक्ला हे अंतराळात गेलेले दुसरे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलेले पहिले भारतीय आहेत. ते सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहेत आणि तिथे १४ दिवस असतील. या काळात ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर विविध प्रयोग करणार आहेत. या प्रयोगांमुळे गगनयान मोहिमेसह इस्रोच्या आगामी योजना यशस्वी होण्यास मदत होणार आहे. अंतराळातील वातावरण वनस्पती आणि सूक्ष्मजंतूंवर कसा परिणाम करते, हे देखील बघितले जाईल. प्रयोगांतून मिळालेल्या माहितीमुळे भारताला अंतराळातील मानवी जीवन सुधारण्यास मदत होणार आहे.

शुभांशू शुक्ला यांच्या नेतृत्वातील पथक भारतासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एकूण सात प्रयोग करणार आहे. या प्रयोगांमधून अंतराळात कमी गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होऊ शकतो हे कळण्यास मदत होणार आहे.

  1.  पहिला प्रयोग : सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे सूक्ष्म शैवालांवर होणारे परिणाम तसेच किरणोत्सर्गाचे सूक्ष्म शैवालांवर होणारे परिणाम. हा प्रयोग इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जीनोम रिसर्च आणि भारत सरकारचा बायोटेक्नॉलॉजी विभाग यांच्या सहकार्याने केला जाणार आहे.

  2. दुसरा प्रयोग : अंतराळात कोशिंबिरीच्या बिया वाढवणे. कृषी विज्ञान विद्यापीठ, धारवाड आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, धारवाड यांच्या सहकार्याने हा प्रयोग केला जाणार आहे.

  3. तिसरा प्रयोग : युटार्डिग्रेड पॅरामॅक्रोबायोटस प्रजाती अंतराळात कशी जगते ? पुनरुत्पादन कसे करते आणि त्याच्या आरएनएमध्ये कोणते बदल होतात ? हा प्रयोग भारतीय विज्ञान संस्थेसाठी (आयआयएससी) केला जाणार आहे.

  4. चौथा प्रयोग : अंतराळात स्नायूंवर होणारे परिणाम. हा प्रयोग स्टेम सेल सायन्स अँड रीजनरेटिव्ह मेडिसिन (इनस्टेम), डीबीटी यांच्यासाठी केला जाणार आहे.

  5. पाचवा प्रयोग : अंतराळात इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेशी मानव कसा संवाद साधतो ? हे भारतीय विज्ञान संस्थेसाठी तपासले जाणार आहे. या प्रक्रियेवेळी कमी गुरुत्वाकर्षणात इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेशी मानवी संवादाचे विश्लेषण करणे, हा एक विशेष प्रयोग केला जाईल.

  6. सहावा प्रयोग : सायनोबॅक्टेरिया अंतराळात कसे वाढतात ते बघितले जाईल. आंतरराष्ट्रीय अनुवांशिक अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञान केंद्र, डीबीटीसाठी हा प्रयोग केला जाईल.

  7. सातवा प्रयोग : कमी गुरुत्वाकर्षणाचा बियाण्यांच्या वाढीवर आणि उत्पन्नावर काय परिणाम होतो हे पाहिले जाणार आहे. भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, अंतराळ विभाग आणि कृषी महाविद्यालय, वेलानियानी, केरळ कृषी विद्यापीठ यांच्यासाठी हा प्रयोग केला जाणार आहे.


 

 
Comments
Add Comment

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट

माजी सरन्यायाधीश सुशील कार्की यांच्या हाती नेपाळचे नेतृत्व, राष्ट्रपतींनी दिली शपथ

काठमांडू: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि 'जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणाईच्या जोरदार आंदोलनानंतर अखेर