Pratap Sranaik : "वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्थेत बदल करणार" प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश...

मुंबई : रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये  पार्किंग व्यवस्था आणणे महत्त्वाचे आहे.  त्या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA ) प्रदेशात नगरविकास विभागाने आपल्या नियमांमध्ये मध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. असं मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची व्यक्त केलं आहे.


तसेच प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये  परिवहन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय सेठी , नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव असिम गुप्ता तसेच परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी- निजामपुर, पनवेल, मीरा-भाईंदर, वसई विरार या महापालिकेचे आयुक्त उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले भविष्यात शहराच्या विकास आराखड्यात मध्ये महापालिकेने पार्किंग साठी विशेष जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक ठरणार आहे.


त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने आपल्या नियमामध्ये बदल करून नवीन १४ सुचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA ) प्रदेशातील महापालिकांना पाठवावा. असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्री सरनाईक म्हणाले "भविष्यात शहराच्या विकास आराखड्यात मध्ये महापालिकेने पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक ठरणार आहे. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने आपल्या नियमावली मध्ये बदल करून नवीन १४ सुचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA ) प्रदेशातील महापालिकांना पाठवावा." असे सरनाईक म्हणाले.


 नगर विकास खात्याचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता म्हणाले, भविष्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अवैध पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने आपल्या मोकळ्या जागेवर पे ॲड पार्क वर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे .तसेच खाजगी सोसायटी व जागा मालकांच्या पूर्व परवानगीने कार्यालयीन वेळेच्या पश्चात(रात्री १२-६) पे ॲड पार्क वर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी देखील महापालिकेने चाचपणी करणे आवश्यक आहे. याबरोबरच जे रस्ते रुंद आहेत, त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही अशा प्रकारे महापालिकेने एक दिवस आड पार्किंग व्यवस्था निर्माण केली पाहिजे .तसेच पे ॲड पार्क वर आधारित असलेली पार्किंग व्यवस्था ही मनुष्य हस्तक्षेपा शिवाय होण्यासाठी फास्ट टॅग वर आधारित असल्यास लोकांना त्याचा सहज वापर करणे शक्य होईल.
याबरोबरच पार्किंगचे शुल्क हे अतिशय कमी ठेवावेत जेणेकरून लोकांना परवडेल आणि ते सहजगत्या उपलब्ध पार्किंग व्यवस्थेचा फायदा घेतील . अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी यावेळी केली.


भुमीअंतर्गत पार्किंग व्यवस्था निर्माण करा


महानगरातील जागेची कमतरता लक्षात घेता उद्याने व बगीचा याच्या खाली भूमीअंतर्गत पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, ठाणे शहरांमध्ये ठाणे महापालिकेने अशा प्रकारचा उपक्रम राबवला असून तो पारदर्शक असल्यामुळे इतर महापालिकेने देखील त्याचं अनुकरण करावं. असे मार्गदर्शन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Comments
Add Comment

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

नेव्हल परिसरातील रायफल चोरी प्रकरणात ट्विस्ट; आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतात

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी मुंबई : भारत सरकारने अ

महावितरण पहिल्या क्रमांकावर, केंद्राच्या क्रमवारीत १०० पैकी मिळाले ९३ गुण

मुंबई : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या क्रमवारीत महावितरणने १०० पैकी ९३ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, एसटीच्या ७५ बसस्थानकावर 'मोफत वाचनालय'

मुंबई: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या ७५ प्रमुख बस