प्रहार विशेष 'एक्सप्लेनर' लेख: रिअल इस्टेट इनव्हेस्टमेंट ट्रस्ट (रिटस् REITs) म्हणजे काय?

लेखक - प्रतिक दंतरा (हेड – इन्व्हेस्टर रिलेशन्स अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजी, नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट अ‍ॅण्ड एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर, इंडियन REITs असोसिएशन)

रिअल इस्टेट अर्थात स्थावर मालमत्ता हा भारतीय गुंतवणूक पोर्टफोलिओचा एक मूलभूत घटक असून तो भांडवल वाढीसह सातत्यपूर्ण उत्पन्न मिळवून देतो. तथापि, व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करणे हे खूप मोठे आव्हान आहे.

विशेषतः महानगरे आणि टियर वन शहरांमध्ये तर ते खूपच मोठे आव्हान ठरते. एकतर या ठिकाणी व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. त्याचबरोबर मालमत्तेचे व्यवस्थापन अतिशय गुंतागुंतीचे असल्यामुळे तेथे अनेक गुंतवणूकदारांना व्यावसायिक स्वरुपाची कार्यालये आणि मॉल यासारख्या व्यावसायिक मालमत्ता खरेदी करणे खूपच कठीण होते. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) हे गुंतवणूकदारांना कमीत कमी गुंतवणुकीआधारे रिअल इस्टेटमध्ये उतरण्याची संधी प्रदान करताना आत्ताच उल्लेख केलेल्या रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीच्या आव्हानांवर अनेक उपायही प्रदान करतात. रिटच्या मालमत्तेचे व्यवस्थापन रिटच्या व्यवस्थापकाद्वारे अतिशय व्यावसायिकरित्या केले जाते. रिट्सने रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीची सुलभ आणि विस्तृत सुविधा प्रदान केली आहे. रिटसबाबत मूलभूत गोष्टी आणि गुंतवणूक क्षेत्रात त्यांचे असलेले महत्त्व आपण या लेखातून जाणून घेऊया.

रिटस (REITs) म्हणजे नक्की काय?

भारतात रिटस् हा गुंतवणूकीचा प्रकार सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे नियंत्रित केला जातो. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) हा उत्पन्न मिळवून देणाऱ्या रिअल इस्टेट मालमत्तेची मालकी धारण करत असतो, अथवा या मालमत्तेचे कामकाज सांभाळणाऱ्या गुंतवणूकीचा एक प्रकार आहे.

रिट हा 'एकूण परतावा' देणारा गुंतवणूकीचा पर्याय आहे. हा पर्याय सामान्यत: भाडे वितरणाद्वारे नियमित उत्पन्न देतो. त्याचबरोबर कालांतराने संभाव्य भांडवल वाढही मिळवून देतो. मालमत्तेद्वारे निर्माण होणाऱ्या उत्पन्नाचा वाटा थेट मालमत्ता खरेदी न करताही रिटमध्ये गुंतवणूकीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अशाप्रकारे मिळवता येतो. भारतात, रिटसला प्राप्त होणाऱ्या रोख निधीतील किमान ९० टक्के रक्कम वर्षातून किमान दोनदा आपल्या गुंतवणूकदारांना वितरीत करणे बंधनकारक आहे. तथापि, भारतातील चार सूचीबद्ध रिटस् हे दर तिमाहीलाच निधीचे गुंतवणूकदारांना वाटप करतात. भारतातील पहिले रिट हे एप्रिल २०१९ मध्ये सूचीबद्ध झाले. सध्या, भारतीय शेअर बाजारांमध्ये चार रिट सूचीबद्ध आहेत. त्यांची नावे अनुक्रमे एम्बेसी रिट, माइंडस्पेस रिट, ब्रुकफील्ड इंडिया ट्रस्ट आणि नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट (सूचीबद्ध क्रमाने) अशी आहेत.

इंडियन REITs असोसिएशन (IRA) च्या डेटानुसार, भारतातील चार REITs नी Q4 FY25 मध्ये २.६४ लाखांहून अधिक युनिटधारकांना १५५३ कोटींपेक्षा जास्त रक्कम वितरित केली आहे. रिटसमध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. डिमॅट खाते असलेला कोणताही गुंतवणूकदार स्टॉक एक्सचेंजद्वारे रिटचे युनिट्स खरेदी करू शकतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदार, संस्थात्मक गुंतवणूकदार - परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांना रिटसचे युनिट सहज उपलब्ध होतात.

रिटसमध्ये गुंतवणूक करणे का आवश्यक आहे?

1) सुलभता (Accesibility) - व्यावसायिक व्यवस्थापन असलेल्या रिअल इस्टेट मालमत्तेचे अगदी कमी भांडवली खर्चातही रिटस् मालकी हक्क प्रदान करतात.

2) तरलता (Liqidity) - रिट युनिट्सचे शेअर बाजारांत मुक्तपणे व्यवहार केले जातात. त्यामुळे गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्सप्रमाणेच त्यांची सहजपणे खरेदी-विक्री करता येते.

3) पारदर्शकता (Transparency) – रिटससाठी अतिशय कडक नियमावली असून त्यांच्यासाठी अत्यंत सक्षम प्रशासकीय चौकट आखण्यात आलेली आहे, तसेच सेबीव्दारे निश्चित करण्यात आलेली प्रकटीकरणे वेळोवेळी सादर करणे बंधनकारक आहे.

4) कर-कार्यक्षम उत्पन्न (Tax Efficient Yields) - रिटस् सामान्यतः सातत्यपूर्ण कर-कार्यक्षम उत्पन्न प्रदान करतात. कारण रिटला प्राप्त होणाऱ्या रोख प्रवाहाच्या किमान 90 टक्के निधी हा दर सहामाहीला गुंतवणूकदारांना वितरित करण्याच्या मापदंड नियामकांनी निश्चित केलेला आहे.

5) विविधता (Diversification)  - रिटस् रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करतात आणि विविधता प्रदान करणारे एक मौल्यवान साधन म्हणून काम करतात. सामान्यत: इतर मालमत्ता वर्गांशी त्यांचा कमी संबंध असतो.

यात कोणती जोखीम आहे काय?

सर्व गुंतवणूकीप्रमाणे, रिटसमध्ये काही विशिष्ट जोखीमा समाविष्ट असतात आणि त्या अशा आहेत -

१) व्याजदर संवेदनशीलता (Interest Rate Sensitivity) - वाढत्या व्याजदरांच्या काळात रिटस् निराशाजनक कामगिरी करू शकतात. कारण कर्जासाठी उच्च खर्चामुळे त्यांच्या परताव्याला फटका बसू शकतो आणि अन्य गुंतवणुकीच्या तुलनेत ते कमी आकर्षक ठरू शकतात.

२) बाजारातील अस्थिरता (Market Volatility) - जरी रिट युनिट्स सामान्यतः समभागांपेक्षा कमी अस्थिर असले, तरीही बाजारातील मंदीच्या काळात त्यांच्यात चढ-उतार होतात.

३) क्षेत्र-निहाय जोखीमा ( Sector Specific Risks) - आर्थिक परिस्थिती आणि बाजारातील चढउतार वेगवेगळ्या मालमत्ता क्षेत्रांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करू शकतात. त्याचप्रमाणे रिटच्या कामगिरीवरही परिणाम होऊ शकतो.

सूज्ञपणे गुंतवणूक करा -

रिटस् हे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकीचे एक सुलभ साधन असून त्यामध्ये व्यावसायिक व्यवस्थापन आणि तरलता (Liquidity) यांचे अतिरिक्त फायदे आहेत. तथापि, कोणत्याही गुंतवणुकीप्रमाणे, यातही सखोल संशोधन आवश्यक आहे.

गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची आर्थिक उद्दिष्टे, जोखीम सहन करण्याची क्षमता आणि बाजारातील परिस्थिती विचारात घ्या. आर्थिक व्यावसायिकांकडून सल्ला घेतल्याने वैयक्तिक मार्गदर्शन देखील तुम्हाला मिळू शकते. रिटस् हे गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये मौल्यवान भर ठरू शकते. तो वैविध्यपूर्ण गुंतवणूक धोरणाचा भाग असलाच पाहिजे.
Comments
Add Comment

BMC : नालेसफाईचे काम १०० टक्के तर मग गाळ आणि कचऱ्याचे तुडुंब नाले भरलेले कसे?

मनसेचे महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी): सत्ताधारी आणि प्रशासन कितीही ओरडून

Ind Vs Pak Womens T-20 World Cup : भारतीय संघाला सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे आव्हान; संघात मोठे बदल होण्याची शक्यता

बर्मिंगहॅम : भारतीय महिला संघ रविवारी(१४ जून)आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गट

Shubham Gill & Sheryas Iyer : शिखर धवनचा विक्रम धोक्यात! शुभमन गिल-श्रेयस अय्यरसमोर इतिहास रचण्याची संधी

धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आणि स्टार फलंदाज श्रेयस

Short Film : राज्य शासनाकडून बालचित्रपट निर्मितीला चालना; माहितीपट व लघुपटांसाठी अर्थसहाय्यात मोठी वाढ

मुंबई, राज्यातील दर्जेदार माहितीपट, लघुपट आणि बालचित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Suraj Chavan : लवकरच आई-बाबा होणार सुरज-संजना; डोहाळेजेवणाचे खास फोटो-व्हिडीओ व्हायरल

मुंबई : 'Bigg Boss Marathi 5' चा विजेता (Winner) आणि लोकप्रिय रीलस्टार (Reel Star) सुरज चव्हाण (Suraj Chavan) आणि त्याची पत्नी संजना गोफणे (Sanjana Gofane)