Friday, June 27, 2025

Stock Market Analysis: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याची अखेर रॅलीने सेन्सेक्स ३०३.०३ व निफ्टी ८८.८० अंकांने वधारला भारतीय बाजारातील Fundamental जगाच्या तुलनेत भक्कम!

Stock Market Analysis: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याची अखेर रॅलीने सेन्सेक्स ३०३.०३ व निफ्टी ८८.८० अंकांने वधारला भारतीय बाजारातील Fundamental जगाच्या तुलनेत भक्कम!
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात समाधानकारक वाढ झाली आहे. आज शेअर बाजारातील सकाळची किंचित तेजी मध्यम पातळीवर वाढली. परिणामी सेन्सेक्स सत्राअखेरीस ३०३.०३ अंकांने वाढला आहे तर निफ्टी ५० निर्देशांकात ८८.८० अंकांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सेन्सेक्स पातळी अखेरीस ८४०५८.९० व निफ्टी पातळी २५६३७.८० पातळीवर पोहोचली आहे. विशेषतः सपाट पातळीवर गेलेला बँक निर्देशांकात अखेरीस समाधानकारक सुधारणा झाली. सेन्सेक्स बँक निर्देशांक २५०.३४ अंकाने वाढत ६४५५६.०२ पातळीवर स्थिरावला आहे. बँक निफ्टी २३७.२० अंकांने वाढत ७७४४३.९० पातळीवर स्थिरावला. विशेषतः सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ कायम होती.सेन्सेक्स मिडकॅप स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३८%,०.५४% वाढ झाली आहे. तर निफ्टी मिडकॅप, स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२७%, ०.९१% वाढ झाली आहे. सलग चौथ्यांदा बाजारात झालेली ही वाढ आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. आज सकाळी वाढलेल्या आयटी समभागात अंततः घसरण झाली. आयटी (०.४४%) शिवाय रिअल्टी (१.५५%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.३६%), एफएमसीजी (०.०२%) समभागात घसरण झाली असून सर्वाधिक वाढ तेल व गॅस (१.१९%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.६६%), पीएसयु बँक (०.४७%), हेल्थकेअर (०.७१%), फार्मा (०.५५%) या समभागात झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, जिओ फायनांशियल सर्विसेस अशा महत्वाच्या समभागात वाढ झाल्यामुळे आज बाजारात मुख्यतः वाढ झाली आहे.

आज अमेरिका चीन करारानंतर भारत युएस कराराची बाजारात आस लागल्याने भारतीय बाजारात उत्साहाचे वातावरण होते. एफटीए (Foreign Trade Agreement) हे भविष्यात अपेक्षित असल्याने बाजारातील भावना प्रफुल्लित झाल्या तसे संकेत अमेरिकेकडून मिळाल्याने बाजारात विशेषतः फायनांशियल सर्विसेसचे समभाग तेजीत राहिले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या ९० दिवसांच्या परस्पर शुल्क निलंबनाची (Reciprocal  Trade) मुदत संपताना, बाजाराचे लक्ष ही मुदत वाढवणार की नाही याकडे लागले होते .आयटीत मात्र अनपेक्षित घसरण झाली आहे. सुरुवातीच्या सकाळच्या सत्रात आयटी, बँक, ऑटो शेअर्सने चांगले प्रदर्शन केले होते. मात्र दुपारनंतर त्यामध्ये संथ गतीने घसरण होत गेली.

युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात लवकरच कपातीची आशा मावळल्यानंतर बाजारात घरगुती गुंतवणूकदारांबरोबरच वाढीव गुंतवणूक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अपेक्षित आहे. डॉलरमध्येही झालेली घसरण, सोन्याच्या दरात झालेली घसरण, कच्च्या तेल (Crude Oil) मध्ये झालेली किरकोळ वाढ यामुळे बाजारात सपोर्ट लेवल राखण्यास यश आले आहे. मात्र दुसरीकडे आज कुठलाही विशेष 'ट्रिगर' नसल्याने अपेक्षित यश गुंतवणूक दारांना मिळू शकले नाही जे मागील सत्रात गुंतवणूकदारांना मिळाले होते. गेल्या आठवड्यात दोन्ही सेन्सेक्स निफ्टीत २ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्यपूर्वेकडील दबाव वाढल्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांचे नुकसान अपेक्षित होते. मात्र प्रथम इराण आणि इस्त्राईलच्या युद्धात प्रथम प्रवेश व नंतर युद्धविरामासाठी अमेरिकेने केलेल्या हस्तक्षेपामुळे स्थिती काहीशी थंड झाली आणि प्रचंड वाढलेल्या तेलाच्या दरात घसरण सुरु झाली. मात्र पुरवठ्यात घट झाल्याने पुन्हा संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.६९% वाढ झाली आहे तर Brent Future निर्देशांकात ०.६६% वाढ झाली आहे. मात्र सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत घसरण कायम राहिली आहे.

जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.४५% घसरण झाली आहे तर भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समधील सोन्याच्या निर्देशांकात १.३६% घसरण झाली होती. बाजारातील स्थिती पाहता चांदीच्या मागणीत वाढ झाले ली असताना पुन्हा एकदा पुरवठ्यात वाढ झाल्याने चांदी स्वस्त झाली आहे.चांदीचा निर्देशांक एमसीएक्समध्ये १.७६% घसरला होता. युएस डॉलरच्या तुलनेत रुपयात ११ पैशाने वाढ झाल्याने बाजारात सुधारणा झाली. एकप्रकारे सोन्याच्या साठ्यातील प्रमाणातही वाढ होणे अपेक्षित होते.

एकूणच बाजारातील बुलिश ट्रेंड कायम राहतानाच सकाळी 'प्रहार' अपडेटमध्ये म्हटल्याप्रमाणे आजही तेजी कायम राहिली आहे. आज आठवड्याची अखेर असल्याने पुढील दिवशी बाजार काय नवे वळण घेते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज अखेरच्या सत्रात हिमाद्री स्पेशल (१२.५२%), एलटी फूड (९.४८%), किर्लोस्कर ब्रदर्स (८.९९%), रेडिंगटन (८.४७%), भारती हेक्साकॉम (८.१४%), कोरोमंडल इंटरनॅशनल (६.७२%), होम फर्स्ट फायनान्स (६.२४%), आयडीबीआय बँक (६.१६%), रेमंड लाईफस्टाईल (५.९४%), अदानी टोटल गॅस (५.७२%), नुवामा वेल्थ (४.८९%), जेके सिमेंट (४.०५%), महानगर गॅस (४.४७%), टोरंट फार्मा (३.६९%), जिओ फायनांशियल सर्विसेस (३.५०%), होंडाई मोटर्स (३.०९%), श्री सिमेंट (३.०७%), अपोलो हॉस्पिटल (२.९१%), सिमेन्स एनर्जी (२.६०%), अदानी ग्रीन एनर्जी (२.३८%) या समभागात झाली आहे.

तर सर्वाधिक घसरण कोहांस लाईफ (Cohance Life) ५.७८%, फिनिक्स मिल्स (३.४९%), ओबेरॉय रिअल्टी (३.२%), रेडिको खेतान (३.१६%), कजारिया सिरामिक (२.६८%), कोचीन शिपयार्ड (२.२५%),अपोलो ट्युब (२.३३%), ब्लू स्टार (२.२२%), न्यूजेसॉफ्टवेअर (२.१३%), इंडियन हॉटेल्स (१.९९%), टाटा कंज्युमर प्रोडक्ट (१.८४%), जिन्दाल स्टील (१.६३%), डॉ रेड्डीज (१.५५%), ट्रेंट (१.४३%), लोढा डेव्हलपर (१.३३%), विप्रो (१.२९%), इटर्नल (१.२५%), टेक महिंद्रा (०. ९३%), ओएनजीसी (०.७८%), ग्रासीम इंडस्ट्रीज (०.७७%), ब्रिटानिया (०.५७%), मारूती सुझुकी (०.५७%) या समभागात झाली.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की, 'अमेरिकेतील आर्थिक तिमाहीचे आकडे आज जाहीर झाले. एम्प्लॉयमेंटमध्ये थोडी सुधारणा आहे.पण युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या खेळामुळे अमेरिकेला नुकसान झालेले दिसत आहे. या तिमाहीतील आकड्यांवरून दरकपात होऊ शकेल अशी थोडी फार शक्यता अमेरिकेतील फेड रिझर्व्हला वाटू शकेल. पुढील तिमाहीचे आकडे येण्या अगोदर दर कपातीची शक्यता वाटते. जर तसे घडले तर भारतासाठी चांगली गोष्ट असेल.

बाजार हळूहळू डिफेन्स बरोबरीने इतर क्षेत्रातही रूची दाखवत आहे हे काल पासुन जाणवायला लागलं आहे बाजारासाठी खुपच हेल्दी बाब आहे.पुढील आठवड्यात जर तेजी चौफेर म्हणजेच सर्व क्षेत्रात जाणवायला लागली तर ते संकेत मोठ्या तेजीकडेच घेऊन जातील.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' २७ जून रोजी बेंचमार्क निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्स हिरव्या रंगात स्थिर स्थितीत बंद झाले आणि आठवड्याची अखेर चांगली झाली. इस्रायल-इराण युद्धबंदीनंतर भू-राजकीय तणाव कमी झाल्याने आणि अमेरिका-भारत व्यापार कराराच्या आसपासच्या वाढत्या आशावादामुळे ही तेजी वाढली, ज्यामुळे प्रमुख मॅक्रो टेलविंड्स म्हणून काम केले. आठवड्याभरात, दोन्ही आघाडीच्या निर्देशांकांमध्ये २% पेक्षा जास्त वाढ झाली. व्यापक बाजारांनी चांगली कामगिरी केली, निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉलकॅप १०० ने त्यांची विजयी मालिका सलग सहा सत्रांपर्यंत वाढवली. आठवड्यात मिडकॅप पॅकने २% पेक्षा जास्त वाढ नोंदवली, तर स्मॉलकॅप विश्वाने एक मोठी हालचाल केली, आठवड्यात ४% पेक्षा जास्त वाढ झाली. शुक्रवारीच्या सत्रात सेन्सेक्स ३०३.०३ अंकांनी किंवा ०.३६% ने वाढून ८४,०५८.९० वर स्थिरावला, तर निफ्टी५० ने ८८.८० अंकांनी किंवा ०.३५% ने भर घालून २५,६३७.८० वर बंद झाला.

क्षेत्रीयदृष्ट्या, बाजाराची व्याप्ती सकारात्मक राहिली, बहुतेक एनएसई निर्देशांक हिरव्या रंगात होते. निफ्टी ऑइल अँड गॅसने १.१९% वाढीसह समकक्षांना मागे टाकले, त्यानंतर निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर आणि निफ्टी एनर्जी अनुक्रमे १.०७% आणि १% वाढले. पीएसयू बँका, फार्मा, मेटल आणि मीडिया यांनीही मध्यम वाढ नोंदवली, ०.४% आणि ०.७% दरम्यान वाढले. वित्तीय दिग्गज कंपन्यांमध्ये सौम्य वाढ दिसून आली, निफ्टी बँक आणि निफ्टी प्रायव्हेट बँक अनुक्रमे ०.४१% आणि ०.३२% वाढले.दुसरीकडे, निफ्टी रिअॅलिटी सर्वात मोठा ड्रॅग म्हणून उदयास आला,१.५५% घसरला, तर आयटी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रांमध्ये सौम्य नफा झाला. दरम्यान,बाजारातील अस्थिरता आणखी थंडावली, इंडिया VIX १.९% घसरून १२.३६ वर पोहोचला, जो अधिक स्थिरतेचा संकेत देतो.'

आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले,' निर्देशांकाने एक मोठी तेजीची कँडल तयार केली आहे, ज्यामध्ये वरच्या दिशेने उच्च आणि कमी सिग्नलिंग चालू आहे. अपेक्षित रेषांवर प्रक्रियेत निर्देशांक गेल्या 6 आठवड्यांच्या श्रेणी (२५२००-२४५००) च्या सकारात्मक गतीच्या सिग्नलिंग विस्तारापेक्षा वर घट्ट बंद झाला.

पुढे जाऊन, निर्देशांक एकूण सकारात्मक पूर्वाग्रह राखेल आणि येत्या आठवड्यात २५९००- २६००० पातळीकडे जाईल, जो गेल्या आठवड्यांच्या श्रेणी (२५२००-२४५००) चा मोजमापात्मक परिणाम असेल. सध्याची तेजी सकारात्मक बाजार रुंदीने पुष्टी केली आहे, जी व्यापक-आधारित क्षेत्रीय सहभागाद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे, जी चालू वाढीच्या ट्रेंडमध्ये आणखी विश्वासार्हता जोडते. अलिकडच्या एकत्रीकरण श्रेणी २५१००-२५२०० चा वरचा बँड त्याची भूमिका उलटण्याची आणि येत्या आठवड्यात प्रमुख आधार म्हणून काम करण्याची शक्यता आहे.

आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' साप्ताहिक चार्टवरील बँक निफ्टीने एक मोठी बुल कॅन्डल (Bull Candle) तयार केली आहे ज्यामध्ये उच्च आणि उच्च कमी सिग्नलिंग ताकद आणि वरच्या हालचाली सुरू आहेत. या प्रक्रियेत निर्देशांकाने नवीन उच्चांक गाठला आहे. निर्देशांकातील रचना स्थिरपणे तेजीत आहे कारण ती एप्रिलपासून २०-दिवसांच्या घातांकीय मूव्हिंग सरासरी (EMA) वर टिकून असल्याचे दिसून येत आहे.सतत वरच्या गतीचे एक प्रमुख सूचक हे एक सूचक (Indicator) आहे.

५६,०००-५३,५०० च्या एकत्रीकरण क्षेत्रातून अलिकडच्या ब्रेकआउटला पाहता,गर्भित पॅटर्न लक्ष्य येत्या सत्रांमध्ये ५८,०००-५८,५०० अंकांकडे वरच्या दिशेने संभाव्यतेचा अंदाज लावते. या अंदाजाला तेजीच्या किंमत रचना आणि गती निर्देश कांनी आणखी पाठिंबा दिला आहे. दैनिक १४ कालावधीचा आरएसआय (RSI) वरच्या ट्रेंडमध्ये राहतो, जो तेजीच्या रचनेला आणखी प्रमाणित करतो. नकारात्मक बाजूने, प्रमुख आधार ५६,०००-५५,५०० क्षेत्राशी पुन्हा कॅलिब्रेट करण्यात आला आहे, जो तांत्रिक घटकांचा संगम दर्शवितो - म्हणजे, २०-दिवसांचा EMA आणि गेल्या आठवड्यातील अलीकडील स्विंग निचांकी आहे.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'मध्य पूर्वेतील युद्धबंदी आणि अंतिम मुदतीपूर्वी व्यापार तणाव कमी करण्याच्या आशावाद यासारख्या प्रमुख घटकांमुळे गुंतवणूकदारांच्या मनातील ढग दूर झाले आहेत. सलग दिवसांच्या विक्रीनंतर, एफआयआय स्थानिक बाजारात निव्वळ खरेदीदार बनले आहेत, ज्यामुळे नजीकच्या काळात बाजारातील स्थिरता सुधारण्यास हातभार लागला आहे. शिवाय, तेलाच्या किमती कमी झाल्या आणि भारतीय रुपयात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना देशांतर्गत वाढीच्या थीमवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडले. लवचिक वापर आणि तुलनेने स्थिर समष्टि आर्थिक पार्श्वभूमीमुळे कमाई वाढण्याची अपेक्षा आशावादाला आणखी बळकटी देत आहे.'

आजच्या निफ्टीतील हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,'गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास मजबूत राहिल्याने निफ्टी वर चढत राहिला. २५,७५०-२५,८०० पूर्वी कोणताही मोठा प्रतिकार न दिसल्याने, निर्देशांक त्याचा वरचा मार्ग सुरू ठेवू शकतो. तथापि, तेजी तीव्र नसण्याची शक्यता आहे आणि २५,८०० चा टप्पा गाठण्यासाठी वेळ लागू शकतो. गेल्या काही दिवसांत झालेल्या तीव्र वाढीनंतर, सध्याच्या पातळीवर बाय-ऑन-डिप्स धोरण अधिक योग्य दिसते. नकारात्मक बाजूने, समर्थन २५,५०० वर ठेवले आहे; या पातळीपेक्षा खाली ब्रेक घेतल्यास एकत्रीकरण होऊ शकते.'

आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालीवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' जागतिक स्तरावर जोखीम भावना सुधारल्याने सोन्याचा व्यवहार कमकुवत झाला. कॉमेक्स सोन्याने ३३०० डॉलरच्या आधार पातळी ओलांडल्यामुळे सोन्याच्या किमती ९६००० हजारच्या खाली झपाट्याने घसरल्या, ज्यामुळे विक्रीचा नवीन दबाव निर्माण झाला.भू-राजकीय तणाव कमी होत असताना, प्रमुख संघर्ष क्षेत्रांमध्ये राजनैतिक तोडगा निघताना, तथाकथित 'पांढरे झेंडे' (White Flags) येण्याचे संकेत असल्याने, सुरक्षित-निवास मागणी कमी होत असताना सोन्याच्या किमतीत ही घसरण झाली आहे.

याव्यतिरिक्त, फेड चेअर जेरोम पॉवेल यांच्या अलीकडील टिप्पण्यां मुळे असे दिसून आले आहे की दर कपात लवकरच होणार नाही, ज्यामुळे भाव भावनेवर आणखी परिणाम करतील. कमकुवत डॉलर निर्देशांकाने जागतिक जोखीम कमी करण्याची पुष्टी केली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना इक्विटी आणि क्रिप्टोकरन्सीसारख्या धोकादायक मालमत्तांमध्ये निधी फिरवण्यास प्रवृत्त केले आहे. कॉमेक्सवर $३३५ वर प्रतिकार आणि $३२५५ वर समर्थनासह सोन्याचा भाव अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. MCX च्या दृष्टीने, नजीकच्या काळात किंमत ९३५०० आणि ९७५०० रूपयादरम्यान चढउतार होण्याची शक्यता आहे.'

आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'डॉलर निर्देशांक ९७ च्या खाली कमकुवत होत राहिल्याने रुपया २५ पैशांनी वाढून ८५.४९ वर स्थिरा वला. मध्यपूर्वेतील तणाव कमी झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत १२-१४% घट झाल्यामुळे गेल्या काही सत्रांमध्ये रुपया मजबूत झाला आहे.  पुढे जाऊन बाजार आगामी फेड धोरण आणि चलनवाढीच्या आकडेवारीवरून संकेत शोधेल.डॉलरच्या हालचालीची दिशा जाणून घेण्यासाठी सहभागींकडून आजचा अमेरिकेतील कोर पीसीई किंमत (PCE Cost) निर्देशांक बारकाईने पाहिला जात आहे.'

अमेरिकन बाजारातही सुरूवातीच्या कलात चढता ट्रेंड कायम राहिला. Dow Jones (०.३८%), S&P500 (०.८०%), NASDAQ (०.९७%) या बाजारात वाढ झाली आहे. तर आशियाई बाजारातील हेंगसेंग (Hengseng) बाजारात ०.१७% घसरण यक्ष शांघाय कंपोझिट (०.७१%) घसरण झाली आहे. मात्र तैवान वेटेड (Taiwan Weighted) बाजारात ०.३९% वाढ झाली आहे. विशेषतः आज शेअर बाजारातील वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (Indian Volatility Index VIX) हा सकाळच्या सत्रात १.४६% उसळला होता जो सत्राअखेरीस -१.६०% घसरल्याने बाजारातील फंडामेंटल आजही कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा