Saturday, October 25, 2025
Happy Diwali

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे निवेदन पत्राच्या माध्यमातून केली आहे. सिंधुदुर्ग हा एक सीमावर्ती जिल्हा आहे आणि एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे.

या जिल्ह्यातील पासपोर्ट अर्जदारांची संख्या दरवर्षी सातत्याने वाढत आहे. जवळील पासपोर्ट सेवा केंद्र नसल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे वेळ आणि पैशांचे मोठे नुकसान होते. जनतेला विलंब आणि त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र ची तातडीची गरज आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

नागरिकांच्या दृष्टीने जे हिताचे आहे, जे गरजेचे आहे. त्याला आमदार निलेश राणे तत्काळ प्राधान्य देऊन कार्यवाही पूर्ण करतात. प्रश्न मार्गी लावतात. विकासकामात मतदारसंघ गतिमान वाटचाल करत असून नागरिकांच्या दृष्टीने अधिकाधिक सेवा सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या कार्यतत्परतेतून दिसून येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा