Nirmala Sitharaman :अर्थमंत्री निर्मला सीतारामन पीएसयु बँकांची घेणार नवी दिल्लीत बैठक 'या' मुद्यांवर चर्चा अपेक्षित

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पब्लिक सेक्टर बँकांच्या अडचणी समजून घेण्याबरोबरच त्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत नुकतीच बैठक घेणार आहेत. यामध्ये बँकेच्या आर्थिक स्थितीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.या बैठकीत अर्थ केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी, वित्त सचिव एम नागराजू व इतर अधिकारीही हजर असतील. याशिवाय बँकिंग तज्ञांसह सरकारी बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहू शकतात.

नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात (Repo Lending Rate) मध्ये अनपेक्षित कपात केली होती. हा दर ६% वरून ५० बेसिस पूर्णांकाने कपात करत ५.५०% वर आणला होता. त्यामुळे बाजारात अतिरिक्त तरलता (Liquidity) निर्माण होण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली होती. बँकेने सीआरआर (Cash Reserve Ratio CRR) दरात ५० बेसिसने कपात केली होती. मात्र सगळी परिस्थिती काही आलबेल नाही. एनपीए कमी करण्यासोबतच बँकेच्या नफ्यात कशी वाढ करता येईल बँकांचे भविष्य व इतर आर्थिक मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

सध्याच्या घडीला देशात १२ सरकारी पीएसयु (Public Sector Undertaking PSU) बँका आहेत. १.७८ कोटींचा नफा बँकांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत कमावला होता. आकडेवारीनुसार या बँकांनी २६% वाढ दर्शविली होती. पहिल्यांदाच आर्थिक वर्ष २०२५ मध्ये खाजगी बँकाहून या बँकेत कर्ज विक्रीत वाढ झाली होती. २०११ पासून ही झालेली पहिल्यांदा वाढ होती. ही वाढ इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १३.१% टक्के दर्शविली होती.

याशिवाय बाजारातील अहवालानुसार मार्च २०१५ नंतर क्रेडिट ग्रोथमध्ये वाढ होत असली तरी ती संथपणे सुरु आहे दुसरीकडे जागतिक पातळीवर दबाव असतानाही खाजगी बँकापेक्षा पीएसयु बँकांच्या समभागांनी (Shares) नी चांगली कामगिरी केली होती. ही वाढ विशेषतः गृह कर्ज वाढीमुळे दर्शविली गेली होती.
Comments
Add Comment

आता आधार कार्डची झेरॉक्स बंद!

फक्त डिजिटल पडताळणीसाठी अनिवार्य मुंबई : सरकारने आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला असून लवकरच नवीन नियम

एलन मस्क यांचे सॅटेलाईट इंटरनेट भारतात लाँच

भारतात स्टारलिंगचे प्लॅन्स हे ८ हजार ६०० रुपयांपासून सुरू वॉशिंग्टन : प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांची

उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे नियोजन वनराई बंधारे करणार

पंचायत समिती २१ बंधारे, कृषी कार्यालय बांधणार ५० शैलेश पालकर पोलादपूर : उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत

सतत स्क्रीनचा वापर करून डोळे थकले असतील तर न चुकता खा हे आठ पदार्थ, चष्म्याचा नंबरही होईल आपोआप कमी

मुंबई : बदललेल्या जीवनशैलीत लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या स्क्रीनसमोर तासन्‌तास काम करणे महत्वाचे झाले आहे. याचा

बाणेरमधील आरोपीला दिल्लीतून पाच महिन्यांनंतर अटक

पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यू प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त