Saturday, August 2, 2025

पालिकेची २ हजार ७०० कोटींची विकासकामे प्रगतिपथावर

पालिकेची २ हजार ७०० कोटींची विकासकामे प्रगतिपथावर

भाईंदर :माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेली २ हजार ७०० कोटी रुपयांची विकास कामे प्रगतीपथावर असून त्यातील अर्ध्या कामांचे लोकार्पण येत्या चार महिन्यात होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विकास कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयात बोलवलेल्या बैठकीत व्यक्त केला. बैठकीला मीरा भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, एमएमआरडीसीचे अतिरिक्त आयुक्त, सूर्या प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता व इतर अधिकारी
उपस्थित होते.


सरनाईक पुढे म्हणाले की, महायुतीच्या कालखंडात एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रासाठी सर्वाधिक निधी दिल्याचे राज्यातील एकमेव उदाहरण असेल, मंजूर निधीतील अर्ध्या कामांचे लोकार्पण येत्या चार महिन्यात होईल तर उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचा मानस आहे.


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले त्यात महापालिका भूखंड अतिक्रमणमुक्त करणे, स्तनदा माता, लहान मुले यांना सोयी सुविधा देण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या प्रत्येक उद्यानात एक हिरकणी कक्ष उभारण्यात यावा, पाळीव प्राण्यांची स्मशानभूमीची निर्मिती करणे यांचा समावेश आहे. तसेच या बैठकीत सुर्या पाणीपुरवठा योजना, जुन्या धोकादायक इमारतींचा प्रश्न, दिव्यांगांचे प्रश्न, अग्निशामक दलाची भरती प्रक्रिया या प्रकल्पांचा आढावा मंत्री सरनाईक यांनी घेतला.

Comments
Add Comment