
हिमाचल प्रदेशमधील तीन ठिकाणी ढगफुटी झाली आहे आणि नऊ ठिकाणी पूर आला आहे. या अचानक आलेल्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे, असे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू म्हणाले म्हणाले. आतापर्यंत २५० लोकांना वाचवण्यात आले आहे. ज्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे, त्यातील चार जणांची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. जंगलातून एकाला वाचवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अचानक आलेल्या संकटामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.#WATCH | Kullu, Himachal Pradesh | Roads in Manali are damaged due to flash floods and heavy rainfall pic.twitter.com/2O29IF2BIe
— ANI (@ANI) June 26, 2025