
?si=Dyz9UkmfK3e7kBy4
ऊन, वारा,पावसाची तमा न बाळगता विठूरायाचं नाम घेत वारकरी चालत असतात. त्यामुळं वारकऱ्यांचे पाय दुखतात.सर्दी,ताप,खोकला व अंगदुखीचा त्रास होतो. त्यामुळं यासाठी त्यांनाउपचाराची गरज असते. त्यामुळं वारी मार्गावर वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. यंदा वारी मार्गावर दर पाच किलोमीटर अंतरावर तात्पुरत्या आपला दवाखाना माध्यमातून माेफत वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. यासाठी आरोग्य विभागाने दीड हजारांवर डाॅक्टर व कर्मचारी पुरवलेत. वारीच्या मार्गावर ४६ ठिकाणी १० खाटा तात्पुरत्या रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. अनेक दानशूर नागरिक व स्वयंसेवी संस्थाही वारकऱ्यांना आरोग्य सेवा मोफत पुरवत आहेत. सलग ३३ वर्षांपासून मुंबई येथील माउली चॅरीटेबल अॅड मेडिकल ट्रस्ट वारकऱ्यांची आरोग्य सेवा करत आहे. यंदाही या ट्रस्टने आळंदीपासून निघालेल्या वारकरी बांधवांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधांचे वाटप केले. वारीतील वारकरी बांधवांची तेल लावून मालीश केली जात आहे. या आरोग्य सेवेसाठी साडेचारशे डॉक्टर व सेवक सहभागी झालेले आहेेत. पंढरपूरपर्यंत त्यांची सेवा सुरू राहणार आहे.

आदित्य ठाकरेची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन आणला मांत्रिक!
शिवसेना नेते रामदास कदम यांचा आरोप मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आता काळी विद्या, जादूटोणा आणि तांत्रिक मांत्रिकांच्या आरोपांपर्यंत पोहोचलाय. ...
जगद्गुरू संत तुकाराम व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यां पुण्यात दाखल झाल्या. त्यावेळी पुणे महापालिकेतर्फे १६ फिरती वैद्यकीय पथके तैनात केली. या माध्यमातून मोफत तपासणी आणि औषधोपचार केले. पुण्यात जवळपास पुण्यात ३०हजार वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले. पालखीतळाच्या परिसरात १० ठिकाणी वैद्यकीय पथके व दवाखाने कार्यरत होते.