
२० वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू
बंगळूरू : बंगळुरूमध्ये रील बनवताना एका २० वर्षीय तरुणीचा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून खाली पडून जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणी (२० वर्ष) बिहारची रहिवासी असून एका शॉपिंग मार्टमध्ये काम करायची. घटनेच्या दिवशी ती रात्री उशीरा आपल्या मित्रांसोबत परिसरातील बांधकामाधीन इमारतीच्या १३ व्या मजल्यावर पार्टी करायला गेली होती. त्यावेळी रील बनवत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडली. या घटनेमध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तिचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी परप्पाना अग्रहारा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सरकारकडून सायबर फसवणुकीची कॉलर ट्यून झाली बंद... नवी दिल्ली : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज सर्वांना आवडतो. पण,गेल्या काही काळापासून ...
दक्षिण पूर्व विभागाच्या पोलीस उपायुक्त फातिमा यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या की, मयत मुलगी आणि तिचे सहकारी इमारतीत पार्टी करत होते. नंतर ते टेरेसवर रील रेकॉर्ड करण्यासाठी गेले आणि ती घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाला. सध्या तरी, नातेसंबंधातील समस्येमुळे हे घडले आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही. सर्व काही तपासाधीन आहे. अनैसर्गिक मृत्यू अहवाल अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.