
डेहराडून: उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग-बद्रीनाथ हायवेवर घोलतीर जवळ भीषण रस्ते अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक बस अलकनंदा नदीत कोसळली यामुळे भीषण अपघात झाला आहे. घटनास्थळी बचावक कार्यासाठी रेस्क्यू टीम रवाना झाली आहे.
उत्तराखंड के रुद्रप्रयाग में अलकनंदा नदी में यात्रियों से भरी बस गिर गई है
बस से छिटक कर 5-6 यात्री बाहर गिर गए
मौके पर बचाव दल की टीम पहुंची है
हादसे में कई लोगों की मौत होने की आशंका है #alaknanda pic.twitter.com/ydyBycUEtT
— Aman (@amantiwari_) June 26, 2025
बसचा अपघात नेमका कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, १८ प्रवाशांना घेऊन जाणारी बस ब्रदीनाथला चालली होती. त्यावेळी चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. ही बस नदीत कोसळली. स्थानिकांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. पोलीस आणि एसडीआरएफचं पथक या ठिकाणी आलं. UK ०८, PA ७४४४ या बसचा अपघात झाला आहे. या बसमध्ये चालकाहह एकूण २० जण बसलेले होते. या बसमध्ये उदयपूर (राजस्थान) आणि गुजरात येथील सोनी परिवार चारधाम यात्रेसाठी आला होता. याच बसचा अपघात झाला आहे.
एकाचा मृत्यू तर ७ जखमी
एका व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी माहिती दिली आहे की या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इतर बेपत्ता प्रवाशांचा शोध पोलीस आणि एसडीआरएफकडून घेतला जातो आहे.