
मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी, पश्चिम रेल्वे चालवण्यात येणाऱ्या उधना-मिरज आषाढी एकादशी विशेष गाडीला उकाई सोनगड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक ०९०७९ उधना –४ जुलै रोजी उधना स्थानकावरून सुटणाऱ्या मिरज विशेष गाडीला उकाई सोनगढ स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही गाडी उकाई सोनगड स्थानकावर दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल आणि दुपारी १२.४७ वाजता निघेल. त्याचप्रमाणे, ५ जुलै रोजी मिरज स्थानकावरून सुटणाऱ्या ०९०८० मिरज-उधना विशेष गाडीला उकाई सोनगड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.
ही ट्रेन उकाई सोनगड स्टेशनवर ०२.३० वाजता पोहोचेल आणि ०२.३२ वाजता निघेल. ट्रेन क्रमांक ०९०८१ उधना – ५ जुलै रोजी उधना येथून सुटणाऱ्या मिरज स्पेशलला उकाई सोनगड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही गाडी उकाई सोनगड स्थानकावर दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल आणि दुपारी १२.४७ वाजता निघेल. त्याचप्रमाणे, ६ जुलै रोजी मिरज स्थानकावरून सुटणाऱ्या ०९०८२ मिरज-उधना विशेष गाडीला उकाई सोनगड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही ट्रेन उकाई सोनगड स्टेशनवर २.३० वाजता पोहोचेल आणि २.३२ वाजता निघेल.