Wednesday, August 6, 2025

Shubhanshu Shukla : २८ तासांच्या प्रवासानंतर शुभांशू शुक्ला अंतराळात पोहोचले; ISA जोडले ड्रॅगन कॅप्सूल

Shubhanshu Shukla : २८ तासांच्या प्रवासानंतर शुभांशू शुक्ला अंतराळात पोहोचले; ISA जोडले ड्रॅगन कॅप्सूल

भारताने अंतराळात मोठी झेप घेतली असून अंतराळवीर शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे. शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या टीमला घेऊन जाणारे ड्रॅगन कॅप्सून देखील यशस्वीरित्या ISAशी जोडले गेले आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजता शुंभांशू शुक्ला यांचे ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले आहेत. २८ तासांच्या प्रवासानंतर शुभांशू शुक्ला यांच्या ड्रॅगन कॅप्सूलची सध्या डॉकिंग प्रक्रिया सुरु आहे.



अमेरिकेच्या स्पेसएक्स आणि अ‍ॅक्सिओम स्पेस यांच्या अ‍ॅक्सिओम -४ मोहिमेअंतर्गत अंतराळात बुधवारी २५ जून रोजी शुभांशू शुक्ला यांनी आपल्या टीमसह उड्डाण केले होते. नासाच्या फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून त्यांनी उड्डाण केले. स्पेसएक्सचे फाल्कन-९ रॉकेटचा यामध्ये वापरण्यात आले आहे. भारतासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे.





२ आठवड्यांची मोहीम


भारतासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. भारताचे विंग कमांडर राकेश यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला ठरले आहेत. २ आठवड्यांच्या कालावधीसाठी ही मोहीम असणार आहे. चारही अंतराळवीर १४ दिवस अंतराळात राहून विविध वैज्ञानिक, जैववैज्ञानिक आणि अभियांत्रिक प्रयोग करणार आहेत. या मोहिमेदरम्यान शुभांशू शुक्ला अंतराळात भारतीय संस्कृतीच्या विविध कलाकृतींचे आणि योगासनांचे सादरीकरण करणार आहेत. या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर ३ आंतरराष्ट्रीय अंतराळवीर नासाच्या अंतराळवीर आणि Ax-४ मोहिमेच्या प्रमुख पेगी व्हिटसन, तसेच पोलंडचे स्लावोस उजनास्की-विस्निवेस्की आणि हंगेरीचे तिबोर काबू सहभागी झाले आहेत.



शुभांशू शुक्लाच्या वडिलांनी केला आनंद व्यक्त


दरम्यान, शुभांशू शुक्ला अंतराळात पोहचल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, “आम्हाला खूप आनद होत आहे. मी देवाचे यशस्वी डॉकिंगबद्दल आभार मानतो. आम्हाला आमच्या मुलाचा खूप अभिमान आहे”


Comments
Add Comment