केबल-स्टे ब्रीज तयारीचा महानगर आयुक्तांनी घेतला आढावा

  43

पावसाळ्यात पूल सुरू करणार : संजय मुखर्जी


मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पस्थळास डॉ.संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए आणि विक्रम कुमार, अतिरिक्त महानगर आयुक्त (१) एमएमआरडीए यांनी भेट देऊन अंतिम तयारीचा आढावा घेतला. हा ब्रीज पावसाळ्यातच हा जनतेच्या सेवेत सुरू करण्यात येईल, असे मुखर्जी यावेळी म्हणाले.


डॉ. संजय मुखर्जी यावेळी म्हणाले की, ‘या आयकॉनिक ब्रीजचे काम आता अंतिम टप्प्यात असून तो नागरिकांच्या सेवेत लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हा पूल केवळ वाहतूक कोंडीवरचा उपाय नसून मुंबईसाठी एक नवा लँडमार्कदेखील आहे. नाविन्य आणि परिणामकारकतेचा संगम साधणारे हे उत्तम उदाहरण आहे. मुंबईच्या 'सिमलेस कनेक्टिव्हिटी'च्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.


हा ब्रीज तयार झाल्यामुळे कुर्ला ते विमानतळ सिग्नल-विरहित वाहतूक करता येणार आहे. वाकोला, बीकेसी आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार,त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे.


सध्या सुरू असलेली कामे




  • सूचना फलक बसविणे

  • केबल-स्टे ब्रीजखालील तात्पुरते दिलेले आधार काढणे

  • रंगकाम व अंतिम सौंदर्यीकरण

  • स्ट्रीट लाईट आणि मध्यवर्ती लँडस्केपिंग


अभियांत्रिकी वैशिष्ट्ये




  • दक्षिण आशियातील पहिला अशा प्रकारचा केबल-स्टे ब्रिज.

  • २१५ मीटर लांबीचा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक असलेला पूल.

  • वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील उड्डाणपुलावरून जाणारा ब्रीज.

Comments
Add Comment

जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा मुंबईच्या दिशेने रवाना, कुठून कसे येणार? जाणून घ्या सविस्तर-

मुंबई: गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटत नसल्याकारणामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या

मुंबईकरांना दिलासा: गणेशोत्सवात 'एलिफस्टन पूल' सुरू राहणार; अनंत चतुर्दशीनंतर होणार पाडकाम

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्यांची मुदतवाढ

मुंबई: सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर) प्रवेश घेऊ

Gold Smuggling: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई... १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त!

मुंबई: कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून १ कोटी

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे